बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

संतापजनक! दारूच्या नशेत वडिलांनी केली जबरदस्ती; काँग्रेस पदाधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल!

ठाणे | आपल्या सख्या पुतणीसोबत अश्लील वर्तन केल्याच्या आरोपाखाली कल्याणमधील काँग्रेस पधाधिकारी आणि त्यांच्या भावा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरेंद्र आढाव असे या पदाधिकाऱ्याचे नाव आहे. ते कल्याण काँग्रेस पक्षाच्या अनुसूचित जाती जमाती सेलचा अध्यक्ष आहे. विशेष म्हणजे सुरेंद्र आढाव काँग्रेसचे बडे नेते संजय दत्त यांचे जवळचे आहेत.

कल्याणच्या खडकपाडा पोलीस ठाण्यात एका 19 वर्षीय तरुणीने गुन्हा दाखल केला आहे. तिच्या तक्रारीनुसार तिचा काका सुरेंद्र आढाव आणि तिचे वडील हे नेहमी तिला, तिच्या आईला आणि भावाला घरगूती कारणावरुन मारहाण करतात. काही दिवसांपूर्वी  तरुणी झोपली असता तिचे वडील त्याठिकाणी आले आणि दारुच्या नशेत तिच्यासोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला.

दुसऱ्या दिवशी सुरेंद्र आढाव घरी आले. त्यांनी तिला मारहाण केली. या दरम्यान तिचे कपडे फाटले. या प्रकरणी खडकपाडा पोलिसांनी काँग्रेसचे कल्याण जिल्हा अनुसूचीत जाती विभागाचे अध्यक्ष सुरेंद्र आढाव आणि त्यांच्या भावा विरोधात मारहाण आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. कोरोना परिस्थितीत सुधारणा झाली की, निवडणूक आयोगाकडून कधीही महापालिका निवडणुकीचं बिगूल वाजण्याची शक्यता आहे. ‘केडीएमसी’ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांनी मोर्चेबांधनी करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, काँग्रेस हा ‘केडीएमसी’त सारखा बॅकफूटवर असणारा पक्ष आहे. काँग्रेसला ‘केडीएमसी’त जास्त जागांवर विजय मिळत नाही. शिवसेना आणि भाजप त्याखालोखाल मनसे ‘केडीएमसी’त बाजी मारताना दिसतात.

थोडक्यात बातम्या – 

अंबानींच्या घरासमोर पीपीई किट घातलेली ती व्यक्ती सचिन वाझे?; ‘फॉरेन्सिक पोडियाट्री’द्वारे होणार तपास!

‘तो येऊन जबाब देऊन गेला, पण महाविकास आघाडी सरकारने काय केलं?’; फडणवीसांचा सरकारवर घणाघात!

‘…पण एका मंत्र्याची विकेट पडणार’; ‘या’ भाजप नेत्याचं मोठं विधान!

बुमराहला शुभेच्छा देणं मयंक अग्रवालला पडलं महागात, वाचा नेमकं काय झालं…

पेस्टकंट्रोल करणं कुटुंबाला पडलं महागात; पालशेतकर कुटुंबावर दु:खाचा डोंगर!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More