पालघर | गडचिंचले साधू हत्त्याकांड प्रकरणी आज 89 जणांना जामीन मंजूर झाला आहे. ठाणे न्यायालयात ही सुनावणी होती. विशेष न्यायाधीश एस. बी. बहालकर यांच्या न्यायालयाने या आरोपींचा जामीन मंजूर केला आहे.
आरोपींच्या वतीने वकील अमृत अधिकारी यांनी न्यायालयात युक्तीवाद केला. पोलिसांनी निरपराध लोकांना अटक केली. त्यांना संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आले होते, त्यामुळे त्यांची जामिनावर सुटका करावी, असा युक्तीवाद करण्यात आला.
पालघर साधू हत्याकांडप्रकरणी एकूण 228 आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. आतापर्यंत या प्रकरणी 194 जणांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.
या हत्या प्रकरणात महाराष्ट्र सीआयडीने डहाणू कोर्टात 11 हजार पानांचे दोन स्वतंत्र आरोपपत्र दाखल केले होते. या प्रकरणात कोणतेही जातीय कारण नसून काही अफवा असल्याचा दावा सीआयडीने तपासणीत केला आहे.
थोडक्यात बातम्या-
“शरद पवारांनी नैतिकता पाळावी, चौकशी होईपर्यंत मुंडेंचा राजीनामा घ्यावा”
नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांनी आधी लस टोचावी त्यानंतर मी लस टोचून घेईन- प्रकाश आंबेडकर
हे राष्ट्रवादी नसून भ्रष्टवादी आहेत- अतुल भातखळकर
“मुंडेंच्या मंत्रिपदाचा राजीनामा मागण्याचा कुणालाही अधिकार नाही”
Comments are closed.