देश

मुंबईत आणखी एका अभिनेत्याचा मृत्यू, हत्या झाल्याचा कुटुंबीयांचा आरोप

मुंबई | बॉलिवूडमध्ये काम करणाऱ्या अजून एका बिहारी अभिनेत्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. मृत कलाकाराचं नाव अक्षत उत्कर्ष असून, तो मुंबईतील फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करत होता.

अक्षत हा मुळचा बिहारमधील मुझफ्फरपूरमधील सिकंदरपूर येथील रहिवासी होता. मृत अक्षतच्या कुटुंबीयांनी त्याच्या संशयास्पद मृत्यूनंतर त्याची हत्या झाल्याचा आरोप केला आहे.

रविवारी रात्री 9 वाजता अक्षतचे त्याच्या वडिलांशी बोलणं झालं. मात्र त्याच रात्री उशिरा त्याच्या मृत्यूची बातमी कळली, असं अक्षतच्या मामांनी सांगितलं आहे. त्याबरोबरच मुंबई पोलीस या प्रकरणी सहकार्य करत नसल्याचा आरोप अक्षतच्या मामांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या-

उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांना कोरोनाची लागण

कागदपत्रे जवळ ठेवण्याची गरज लागणार नाही; पोलिसांना मोबाईलवर दाखवा कागदपत्रे

देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येने ओलांडला 61 लाखांचा टप्पा!

मुंबई इंडियन्सच्या ‘त्या’ निर्णयावर युवराज सिंग नाराज

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या