बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सरकारच्या अडचणीत आणखी वाढ; पुण्यातील कारागृह अधीक्षकाची ‘या’ कारणाने इच्छामरणाची मागणी

पुणे | सरकारभोवती संकटाचं वादळ घोंगावत असतानाच पुण्यातील कारागृह अधीक्षक हिरालाल जाधव यांनी इच्छा मरणाची मागणी केली आहे. तडकाफडकी बदली करण्यात आल्यानं जाधव नाराज आहे. कारण नसताना बदली होत असेल तर मला इच्छा मरण द्यावं, अशी मागणी त्यांनी केली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गृहखात्यातील बदल्यांच्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. त्यामुळे सरकारचे धाबे दणाणले आहेत. फडणवीस यांनी थेट केंद्रीय गृहसचिवांकडे याप्रकरणाची तक्रार करून सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.

पोलीस पथकातील बदल्यांवरून राज्य सरकारला विरोधकांनी घेरलेलं असतानाच आता सरकारच्या अडचणीत आणखी एक भर पडली आहे. तडकाफडकी बदली झाल्यामुळे पुण्यातील कारागृह अधीक्षकाने इच्छा मरणाची मागणी केली आहे. त्यामुळे सरकारच्या चिंतेत अजून भर पडण्याची शक्यता आहे.

माझ्याविरोधात कोणतेही पुरावे नसताना माझ्यावर कारवाई करण्यात आली आहे. गृहखात्यातील अर्थकारणामुळेच हा प्रकार होत असल्याचा गंभीर आरोप जाधव यांनी केला आहे. मला इच्छा मरणाची परवानगी द्या अशी मागणी कारागृह अधीक्षक हिरालाल जाधव यांनी केली आहे.

दरम्यान, सचिन वाझे प्रकरणात सरकारने परमबीर सिंग यांची मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरून होमगार्डच्या प्रमुख पदावर बदली केली होती. मात्र, बदली करताना कोणतही कारण दिलं नाही. आपल्याला होमगार्ड सारखं दुय्यम दर्जाचं डिपार्टमेंट दिलं आहे.  ही शिक्षा असल्याची भावना मनात निर्माण झाल्यानेच परमबीर सिंग यांनी थेट गृहमंत्र्यांचे कारनामे या शिर्षकासह एक लेटर बाहेर काढले होतं.

थोडक्यात बातम्या

धक्कादायक! पतीच्या ह्रदयविकाराने झालेल्या मृत्यूनंतर पत्नीनेही सोडला प्राण; 8 दिवस मृतदेह कुजत होता फ्लॅटमध्ये

अभिनेता आमीर खानलाही कोरोनाची लागण, दोन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्र्यांसोबत झाला कार्यक्रम

राष्ट्रवादीच्या नेत्याकडून देवेंद्र फडणवीस यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप

सचिन वाझेंनी दिलेला जबाब खोटा; ‘त्याच’ गाडीत मनसूख हिरेन यांची हत्या?

महाराष्ट्रातील आणखी एका जिल्ह्यात 10 दिवसांच्या कडक लॉकडाऊनची घोषणा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More