गौतम अदानींना आणखी एक मोठा झटका!

नवी दिल्ली | अदानी (Adani) समूहाच्या अदानी एंटरप्रायझेस, अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोन आणि अंबुजा सिमेंट या तीन समभागांचा ASM च्या यादीत समावेश झाल्यानंतर अदानी समूहाला अमेरिकन बाजारातूनही मोठा धक्का बसला आहे.

7 फेब्रुवारी 2023 पासून कंपनीचे शेअर्स डाऊ जोन्स सस्टेनेबिलिटी इंडेक्समधून काढून टाकले जातील, असं डाऊ जोन्सने म्हटले आहे.

कंपनीचे शेअर्स 7 फेब्रुवारी 2023 पासून म्हणजेच पुढील मंगळवारपासून निर्देशांकातून वगळले जाणार असल्याचं यात म्हटलं आहे.

दररोज अदानींच्या संपत्तीत मोठी घट होताना दिसत आहे. ताज्या आकडेवारीनुसार गौतम अदानी आता जगातील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत टॉप-20 मधूनही बाहेर फेकले गेले आहेत.

अदीनींची एकूण कूण संपत्ती आता 61.3 अब्ज डॉलर इतकी झाली आहे आणि गेल्या 24 तासात त्यांना 10.7 अब्ज डॉलरचं प्रचंड नुकसान झालं आहे.

दरम्यान, अमेरिकेतली हिंडेनबर्ग रिसर्चने अदानी समुहावर घोटाळ्याचे आरोप केले आहेत. हिंडेनबर्गच्या अहवालानंतर अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली.

महत्त्वाच्या बातम्या-