Top News विदेश

जाता जाता डोनाल्ड ट्रम्प यांना आणखी एक मोठा झटका

वॉशिंग्टन | अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना ट्विटरनं आणखी एक मोठा झटका दिला आहे. ट्विटरने डोनाल्ड ट्रम्प यांचं अकाऊंट कायमस्वरुपी बंद केले आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांचं अकाऊंट बंद केल्यानंतर ट्विटरने याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विट्सची आम्ही समीक्षा केली. त्यांच्या ट्विट्समुळे अमेरिकेत दंगे भडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांचे अकाऊंट बंद करण्याचा निर्णय घेतला असे ट्विटरने सांगितलं आहे.

ट्रम्प समर्थकांनी गुरुवारी 7 जानेवारी रोजी अमेरिकेची संसद कॅपिटल हिल भवनमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार आणि तोडफोड केल्याचा प्रकार घडला. या हिंसाचारात आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झाला.

तसंच, हल्ला झाल्यानंतरसुद्धा डोनाल्ड ट्रम्प चिथावणीखोर ट्विट करत होते. फेसबुकच्या माध्यमातूनसुद्धा ते अमेरिकन जनतेला भडकवत असल्याचा आरोप होतोय. त्यांच्या समर्थकांनी संसदेवर केलेल्या हल्ल्यात 5 जणांचा मृत्यू झाला आहे.

थोडक्यात बातम्या-

रोहित शर्मावर शंका घेणं महागात; ‘त्या’ काकांना काढावी लागली अर्धी मिशी!

‘लस घेतलेल्या लाभार्थ्यांची अशी पटणार ओळख’; आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली माहिती

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी काँग्रेसला फटकारल्यावर थोरातांनी केला ‘हा’ सवाल

औरंगाबाद नामांतरावर उदयनराजेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले….

…तर 1 फेब्रुवारीपासून रेशन होणार बंद!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या