बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पंकजा मुंडेंना धक्का! मुख्य सहाय्यक अधिकारी चितळेंना अटक, ‘इतक्या’ कोटींचा घोटाळा!

बीड | चिक्की घोटाळा चर्चेत असतानाच भाजप नेत्या आणि माजी महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या ताब्यात असेलेला वैद्यनाथ अर्बन बॅंक घोटाळा चर्चेत आला आहे. या प्रकरणी उस्मानाबादच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी वैद्यनाथ अर्बन बॅंकेचे सहाय्यक मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन चितळे यांना अटक केली आहे. चितळे यांच्यावर शंभू महादेव साखर कारखान्यात केलेल्या घोटाळा केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे.

परळीमधील वैद्यनाथ बॅंककडे 46 कोटी रूपयाची साखर शंभू महादेव साखर कारखान्याकडे तारण ठेवली होती. जवळपास 1 लाख 14 पोते साखरेत अफरातफर केला असल्याचा आरोप प्रशासनाने नितीन चितळे यांच्यावर ठेवला आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांना हा जबरदस्त धक्का बसला असल्याचं मानलं जात आहे.

शंभू महादेव साखर कारखान्याच्या घोटाळा प्रकरणी कारखान्याचे चेअरमन दिलीप अपेटसह चाळीस जणांविरोधात कळंब पोलीस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा या अगोदर दाखल करण्यात आला होता. त्यावेळी दिलीप अपेट यांना अटक देखील करण्यात आली होती. आता पून्हा या प्रकरणी अपेट यांना अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, पंकजा मुंडे यांचा 2019 च्या निवडणुकीत पराभव झाला होता. तेव्हापासून बीड जिल्ह्यातील त्यांचे असणारे वचर्स्व कमी होताना दिसत आहे. त्यानंतर मुंडे यांना एकामागून एक मोठे धक्के बसताना बघायला मिळत आहे.

थोडक्यात बातम्या- 

KBC मध्ये धोनीबाबत विचारलेल्या ‘त्या’ प्रश्नावर वीरू आणि दादा निरूत्तर, हा होता प्रश्न!

“भाजपमध्ये महिलांना सन्मानाची वागणूक मिळत नाही”; महिला आमदाराच्या आरोपांनी खळबळ

कौतुक हवं! जगातील अब्जाधीशांच्या यादीत पुण्यातील ‘या’ उद्योजकाचा नंबर!

शिवसेना मेळाव्यात संजय राऊतांच्या सभेला खचाखच गर्दी, मुख्यमंत्र्याच्या आदेशाला केराची टोपली!

“जावेद अख्तर यांचा चेहरा पुरोगामी असला तरी त्यांचे अंतरंग कट्टरवादीच”

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More