बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पंजाब काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का, ‘हा’ बडा नेता भाजपच्या वाटेवर?

नवी दिल्ली | देशातील सर्वात जुना पक्ष असलेल्या काँग्रेसची आता काही मोजक्याच राज्यात सत्ता आहे. पंजाब राज्यात सध्या मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंंग यांच्या राजीनाम्यानंतर संघटनेत मोठे बदल होताना दिसत आहेत. पुढील वर्षी होऊ घातलेल्या राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत.

कॅप्टन अमरिंदर सिंंग यांच्या राजीनाम्यानंतर ते भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. अशातच कॅप्टन अमरिंदर सिंंग आज मंगळवारी दिल्लीला रवाना झाले आहेत. सिंग हे आज भाजप अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्यासह देशाचे गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार असल्याची चर्चा शक्यता वर्तवली आहे.

कॅप्टन अमरिंदर सिंंग यांनी राजीनामा दिल्यानंतर काँग्रेस पक्षश्रेष्ठींवर तीव्र नाराजी वर्तवली होती. पक्षश्रेष्ठींनी दोन महिन्यात तीन वेळा आमदारांना दिल्लीला बोलावलं होतं. माझ्या नेतृत्वावर त्यांना संशय होता. मला अपमानित वाटत आहे, त्यांना जो योग्य वाटेल त्यांना मुख्यमंत्री करा, असं कॅप्टन अमरिंदर सिंंग यांनी म्हटलं होतं.

दरम्यान, आज पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा पक्षाध्यक्ष सोनिया गांधीना पाठवला आहे. राजीनामा देताना सिद्धू म्हणाले की, पंजाबच्या भविष्यासाठी आणि कल्याणासाठी मी तत्वांशी तडजोड करू शकत नाही. आता सिद्धू यांच्या राजीनाम्याने भाजपमध्ये कोण प्रवेश करणार सिद्धू की कॅप्टन सिंग हे पाहणं, औत्सुक्याचं ठरणार आहे.

 

थोडक्यात बातम्या – 

“जेव्हा लोक सत्तेसाठी लोभी होतात, तेव्हा ते आपल्या मुली…”; भाजप आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य!

#Video | देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो! ताजोद्दीन महाराजांनी चालू कीर्तनात देह ठेवला

“आमच्या सरकारमध्ये मोबाईल वाजला तर शेतकऱ्यांना वाटायचं मदत आली”

“पंतप्रधान मोदींनी गुजरातप्रमाणे महाराष्ट्राला मदत जाहीर करावी”

‘एका पार्टीला मी 2 लाख खर्च करतो, तर 10 लाखांसाठी…’; फिक्सिंगच्या आरोपावर श्रीसंतने सोडलं मौन!

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More