मोठी बातमी! महाविकास आघाडीला आणखी एक झटका
मुंबई | महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. बहुमत चाचणीपूर्वी विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिंदे गटाचा विजय झाला आहे.
भाजपचे उमेदवार राहुल नार्वेकर हे महाराष्ट्र विधानसभेचे नवे सभापती झाले आहेत. विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मतदानाद्वारे सभापतीसाठी मतदान झालं.
ज्यात शिंदे गटाने महाविकास आघाडीवर पडदा पाडला. या विजयानंतर आता सोमवार, 4 जुलै रोजी विधानसभेत एकनाथ शिंदे गटाला आपलं बहुमत सिद्ध करायचं आहे.
एकनाथ शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर राज्यपाल भगतसिंग कोश्यरी यांनी बोलावलेले विशेष अधिवेशन सुरू झाले आहे. आज पहिल्या दिवशी विधानसभा अध्यक्षपदासाठी मतदान घेण्यात आले. सुरुवातील शिरगणती करण्यात आली. यावेळी एकनाथ शिंदे यांचा पहिला क्रमांक होता. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर देवेंद्र फडणवीस बसले होते.
थोडक्यात बातम्या-
‘…तर एकनाथ शिंदे यांनी हे आधीच केलं असतं’; जयंत पाटलांची जोरदार टोलेबाजी
‘परिक्षेचा निकाल आधीच लागला’; प्रसाद लाड यांचं मोठं वक्तव्य
“वडिलकीचा सल्ला देतो, देवेंद्र फडणवीस यांच्यावर स्वप्नात देखील विश्वास ठेवू नका”
शिवसेना नेत्याचा गंभीर आरोप, राजकीय वर्तुळात खळबळ
राज्यातील ‘या’ भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता, वाचा हवामान खात्याचा अंदाज
Comments are closed.