बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

Rajyasabha Election| महाविकास आघाडीला दुसरा मोठा झटका

मुंबई | राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात जोरदार राजकारण पाहायला मिळत आहे. सहाव्या जागेसाठी शिवसेनेकडून कोल्हापूरचे संजय पवार यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. तर भाजपनंही कोल्हापूरच्याच धनंजय महाडिकांना मैदानात उतरवलंय.

त्यामुळे राज्यसभा निवडणुकीत घोडेबाजार होणार असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात येतोय. तसंच मतांची फाटाफूट टाळण्यासाठी शिवसेनेनं सावध भूमिका घेतल्याचं पाहायला मिळत आहे. अशात अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले असताना महाविकास आघाडीला दणाक्यापाठोपाठ दणके बसत आहेत.

आधी बहुजन विकास आघाडीच्या हितेंद्र ठाकूर यांनी मतदानाबाबत सावध भूमिका घेतली. आणि आमची भूमिका ही मतदानादिवशीच ठरवू असं सांगतलं.

आता महाविकास आघाडीच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. कारण आता सपानेही महाविकास आघाडीला मतदान न करण्याचा निर्णय घेतला आहे.

थोडक्यात बातम्या- 

मोठी बातमी! करण जोहरच्या वाढदिवसाच्या पार्टीत सहभागी झालेल्या 55 जणांना कोरोनाची लागण

“महाविकास आघाडीचा प्रयोग बाळासाहेबांना देखील आवडला असता”

“आम्ही टप्प्यात आल्यावर कार्यक्रम करतोच, शेंबड्या पोराला समजवतात तसं पडळकरांना समजवा”

Monsoon Update: पुढील पाच दिवसात राज्यातील ‘या’ ठिकाणी पावसाची शक्यता; वाचा हवामान खात्याचा अंदाज

“उद्धव ठाकरेंच्या सभेची गर्दी विरोधकांना मोजत बसावी लागेल”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More