शिंदे सरकारचा आणखी एक मोठा निर्णय!

मुंबई | राज्यातील शिंदे सरकारने (Shinde Goverment) आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या (Central Goverment) पीएमश्री योजना महाराष्ट्रात लागू करण्यात येणार आहेत.

आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाने महाराष्ट्रातील शाळांचं पूर्ण स्वरूपच बदलणार असल्याची माहिती समोर आली आहे.

केंद्र सरकारने सप्टेंबर 2022 रोजी योजनेची घोषणा (Annoucement) केली आहे. या अंतर्गत देशात 14 हजार 597 शाळा सुरू करण्यात येणार आहे. स्मार्ट क्लास, ग्रंथालय, कौशल्य प्रयोग शाळा, खेळाचे मैदान, विज्ञान प्रयोगशाळा अशा आधुनिक सोयी सुविधा यामध्ये असतील.

शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढवणं तसेच राज्यातील साक्षरतेचे प्रमाण वाढवण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी माहिती समोर आली आहे. या सर्व शाळा आदर्श शाळा म्हणून ओळखल्या जातील. देशातील 18 लाख विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-