बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

फेसबुक कंपनीचा पुन्हा एक मोठा निर्णय, ‘ही’ महत्त्वाची सुविधा होणार बंद 

मुंबई | सोशल मीडियातील मोठी कंपनी फेसबुकने नुकतचं कंपनीचं नावं बदललं आहे. मेटा हे कंपनीचं नविन नाव आहे. कंपनीने याबाबत अधिकृत घोषणा केली आहे.आता फेसबुकने एक नविन ब्लॉग प्रसिद्ध केला आहे. यामध्ये काही बदल केल्याबद्दलची माहिती प्रसिद्ध केली आहे.

फेसबुककडून आता एक अब्जपेक्षा अधिक लोकांचे चेहऱ्यांचे टेम्लेट हटवले जाणार आहेत. दररोज 600 मिलियन पेक्षा जास्त लोक फेशियल प्रणालीचा वापर करत आहेत.  आता फेसबुकने ही प्रणाली बंद केल्याने फोटो आणि व्हिडीओच्या माध्यमातुन लोकांची आता ओळख होणार नाही.

फेसबुकवर टॅग करत असताना चेहऱ्यावर नाव येतात, हे नावं दिसणं आता बंद होणार आहे. फेशियल रेकग्निशनवर अनेक लोकांनी टीका केली होती. या कारणामुळे कंपनीकडून ही प्रणाली बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान, फेसबुक मेटा या नविन नावाने ओळखलं जाणार आहे.  फेसबुक कंपनी यापुढे व्हर्चुअल रियालिटीमध्ये पाऊल ठेवणार आहे. मेटाव्हर्स म्हणजे आभासी जग. दुर असुनही जवळ असल्याचा आभास मेटाव्हर्स या तंत्रज्ञानातुन करण्याचे अनेक कंपन्यांचे प्रयत्न सुरू आहेत. मेटाव्हर्सद्वारे व्यक्ती स्क्रीनवर आभासी पद्धतीने उपस्थित राहू शकतो, असं मार्क झुकेरबर्ग यांनी म्हटलं होतं. भविष्यात स्मार्टफोन आणि इतर उपकरणांच्या मदतीेने व्हर्चुअल रियालिटी येण्याची शक्यता वर्तवण्यात येत  आहे.

थोडक्यात बातम्या-

धक्कादायक! बुलडाण्यातील मृत महिलेला तामिळनाडूत कोरोनाची लस

देगलूर-बिलोलीच्या विजयानंतर अशोक चव्हाण यांना थेट सोनिया गांधी आणि शरद पवारांचा फोन

ऐन दिवाळीत सर्वसामान्यांना दिलासा; इंधन दरवाढीला ब्रेक!

“चौकशीला सामोरं गेलं नाही तर मात्र अटक करायचं, तरी महाविकास आघाडी सरकार मजबूत”

“खंजीर खुपसून स्वतःचा विकास करण्याचा मार्ग…”

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More