महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा मोठा भूकंप?

मुंबई | लोकसभेच्या निवडणुकींनंतर महाराष्ट्रात विधानसभेचीदेखील निवडणूक असणार आहे. त्यामुळे सध्या घडणाऱ्या घडामोडी जास्त महत्त्वाच्या आहेत. निवडणुकीच्या तोंडावर अनेक नेते पक्षांतर करताना दिसत आहेत. अशात महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा मोठा भूकंप घडणार असल्याचं दिसतंय. कारण काँग्रेस नेते अतुल लोंढे (Atul Londhe) यांनी मोठा दावा केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजलीये.

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा मोठा भूकंप?

अजित पवार (Ajit Pawar) गटातील धनंजय मुंडे, सुनील तटकरे, सुनील शेळके यांच्यासह अनेक बडे नेते भाजपात प्रवेश करु शकतात आणि उरलेले नेते शरद पवार यांच्याकडे परत येऊ शकतात, असा दावा अतुल लोंढे यांनी केला आहे.

अतुल लोंढेंचा मोठा दावा

राष्ट्रवादी काँग्रेस गटात फूट पडलेली आहे. या गटात अजून एक फूट पडणार असल्याचा मोठा दावा अतुल लोंढे (Atul Londhe) यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्याने चर्चांना उधाण आलं आहे.

फुटलेल्या गटात पुन्हा अजून एक फूट पडणार आणि काही लोक भाजपात जाणार, असा दावा अतुल लोंढे यांनी केला आहे. अजित पवार गटातील तब्बल 12 नेते हे भाजपत प्रवेश करतील, असा धक्कादाक दावा अतुल लोंढे यांनी केला आहे.

धोके पे धोका… ऐसा कोई सगा नहीं जिसे भाजपने ठगा नहीं. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे 12 बडे नेते, मंत्री आमदार लवकरच भाजपत प्रवेश करणार. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या शिल्लक राहिलेल्या राष्ट्रवादीचा दुसरा गट शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीत जाणार, सूत्रांची माहिती, असा दावा अतुल लोंढे यांनी ट्विटरवर केला आहे.

अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. तेव्हा त्यांच्यासोबत अनेक आमदार, खासदार, राष्ट्रवादीचे नेते गेले आहेत. मात्र या नेत्यांपैकी काही जण परत शरद पवार गटात येणार असल्याची चर्चा होत आहे. आमदार निलेश लंके पुन्हा शरद पवारांकडे परतणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

सर्वात मोठी बातमी! केंद्र सरकार महत्त्वाचा निर्णय जाहीर करण्याची शक्यता

धोनीच्या चाहत्यांना धक्का?; हा खेळाडू होणार CSK चा कर्णधार?

अजित पवारांना सर्वांत मोठा धक्का बसण्याची शक्यता!

“फडणवीस तुम्ही चुकीच्या माणसाला…”; जरांगेंचा फडणवीसांना गंभीर इशारा

‘या’ 5 गोष्टींमुळे तुम्हीही व्हाल झटपट श्रीमंत!