बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

संजय राठोडांना आणखी एक मोठा धक्का, पूजाच्या कुटुंबातील ‘ही’ व्यक्ती तक्रार करण्यास आली पुढे!

पुणे |  पुजाच्या मृत्यूला 18 दिवस होऊन गेल्यानंतर देखील आजूनपर्यंत एकही तक्रार नोंदवण्यात आली नाही. मात्र या प्रकरणात पहिला गुन्हा दाखल होणार आहे.

पूजा राठोडची चुलत आजी शांताताई राठोड आज गुन्हा दाखल करणार आहेत. शिवाय त्या पुणे पोलीस आयुक्तांची भेट घेणार आहेत. तसेच फिर्यादीत मंत्री संजय राठोड यांचेही नाव टाकणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. शांताताई राठोड या तृप्ती देसाई यांच्या मदतीने वानवडी पोलिस स्टेशनला जाणार आहेत.

अरुण राठोडला खुप मोठं आमिष दाखवलं आहे. अरुण राठोड हा त्याच्याच घरी आहे, दिवसा बाहेर असतो रात्री घरी येतो. पूजाच्या आई वडिलांनी सत्यासाठी बाहेर यायला हवं . त्यांच्या घरच्यांवर दबाव, त्यांना लेकरांची किंमत नाही. पुजाचा खून झालाय, पूजा डॅशिंग मुलगी होती, असं शांताबाई राठोड यांनी म्हटलंय.

पूजाच्या मृत्यूला 18 दिवस झालेले आहेत. पूजाच्या मृत्यू प्रकरणात कुणीही नातेवाईक गुन्हा दाखल करायला आलेले नाहीत. म्हणून मी नातेवाईक या नात्यानं आम्ही वानवडी पोलिस ठाण्यात जाणार आहोत. पूजाच्या मृत्यूप्रकरणी कुणीही आरोपी असो मग ते अरुण राठोड, विलास चव्हाण, असो किंवा मंत्री संजय राठोड असो त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार आहोत, असं शांताबाई राठोड यांनी सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या-

पुण्यात शाळा, महाविद्यालये ‘या’ तारखेपर्यंत बंद; वाचा महापालिका आयुक्तांचा नवा आदेश

राठोडांनी राजीनामा दिला नाही तर आम्ही राजीनामा देणार; देवेंद्र फडणवीसांचा इशारा

संजय राठोडांची विकेट पडल्यानंतर वनमंत्रिपद कुणाला?, ‘या’ नावांची जोरदार चर्चा

…म्हणून इमरान हाश्मीने दिला आलिया भट्टसोबत काम करण्यास नकार!

वनमंत्री संजय राठोड यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भेट नाकारली!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More