बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

धक्कादायक! भाजपच्या आणखी एका आमदाराचं कोरोनाने निधन

लखनऊ | कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशभरात थैमान घातलं आहे. या लाटेत अनेकांनी आपल्या जवळच्या लोकांना गमावलं आहे. त्यासोबतच काही बडे राजकीय नेते, अभिनेते यांनीही कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. आता उत्तर प्रदेशातील भाजप आमदार केसर सिंह गंगवार यांचं कोरोनानं निधन झालं आहे. केसर सिंह गंगवार हे नवाबगंज विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावर निवडून आले होते.

केसर सिंह गंगवार यांना कोरोना संसर्ग झाल्यानंतर नोएडा येथील यथार्थ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयात त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत निधन होणारे केसर सिंह गंगवार भाजपचे तिसरे आमदार आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गंगवार यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. तसेच त्यांच्या कुटुंबीयांचं सांत्वन केलं आहे. उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी देखील केशर सिंह गंगवार यांच्या निधनावर शोक व्यक्त केलाय.

दरम्यान, उत्तर प्रदेशला देखील कोरोना विषाणूचा मोठा फटका बसला आहे. आतापर्यंत भाजपच्या तीन आमदारांचं कोरोनाने निधन झालं आहे. यामध्ये केशर सिंह गंगवार, औरेयाचे भाजप आमदार रमेश दिवाकर आणि लखनऊ पश्चिमचे आमदार सुरेश श्रीवास्तव यांचं कोरोनानं निधन झालं होतं.

 

 

थोडक्यात बातम्या- 

दिलेला शब्द पाळा, केंद्रावर जबाबदारी ढकलून चालणार नाही- पंकजा मुंडे

दिलासादायक! पुण्यात आज कोरोना बाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या जास्त

मन सुन्न करणारी घटना; पतीचा कोरोनामुळे मृत्यू, पत्नीने उचललं मोठं पाऊल

“लसीकरण मोफत असलं तरी लसीची किंमत मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार”

गिरीश भाऊंना राजकारणात जन्माला मी आणलं, म्हणून आज…- एकनाथ खडसे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More