बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अजित पवारांना आणखी एक धक्का, कुटूंबातील ‘या’ व्यक्तीच्या घरी ईडीची छापेमारी

मुंबई | राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार सध्या जरंडेश्वर कारखान्यामुळे प्रचंड चर्चेत आहेत. अजित पवारांच्या चिरंजीव आणि बहिणीच्या घरी आयकर विभागाने छापेमारी केल्याची घटना ताजी असतानाच आता अजित पवारांना पुन्हा एक धक्का बसला आहे. अजित पवार यांचे मावसभाऊ जगदीश कदम यांच्या घरी सकाळी धाड टाकली असल्याची माहिती समोर येत आहे.

दौंड येथील सहकारी साखर कारखान्याचे संचालक जगदीश कदम आहेत. जगदीश कदम हे अजित पवारांचे मावसभाऊ असून कदम हे सहकार नगरमध्ये राहतात. तसेच त्यांच्या घरी आज सकाळी ईडीने धाड मारली असल्याची माहिती समोर येताच कदम मुंबईहून पुण्याकडे जायला निघाले आहेत.

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी जरंडेश्वर कारखान्यात आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप केले होते. यानंतर ईडीने कारखान्यावर धाड मारली होती. सततच्या होणाऱ्या आरोपानंतर अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत जरंडेश्वर कारखान्याची कुंडली समोर मांडली होती. तसेच कारखान्यात कोणतीही अनियमितता झाली नसल्याचा खुलासा कारखान्याकडून करण्यात आला होता. यानंतर देखील ईडीने कदम यांच्या घरी धाड टाकली असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

दरम्यान, 7 ऑक्टोबर 2019 रोजी आयकर विभागाने दौंड येथील जरंडेश्वर कारखान्यावर धाड मारली होती. साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने कारखान्यात कोणती अनियमितता नसल्याचा खुलासा यावेळी केला होता. मात्र तरी देखील जगदीश कदम यांच्या घरी छापा मारण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

थोडक्यात बातम्या-

देशातील कोरोना रूग्णांसह मृतांच्या आकड्यातही वाढ, पाहा ताजी आकडेवारी

“एका ट्विटवरून गुन्हा दाखल करणारे सन्माननीय मुख्यमंत्री आता गप्प का?”

“कोणतेही दाखले काढायचे असल्यास काढून मिळतील- नवाब मलिक झेराॅक्स सेंटर”

उधारीवर एअर इंडियाचा विमान प्रवास बंद, रोख भरा आणि तिकीटं घ्या

सिग्नलच्या देखभालीसाठी पुणे महानगरपालिका खर्च करणार तब्बल एवढे कोटी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More