बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांचा भाजपला आणखी एक धक्का!

पंढरपूर | पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाचे लोकप्रिय दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी त्यांचे सुपूत्र भगीरथ भालके यांना राष्ट्रवादीने उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. तर त्यांच्या विरूद्ध भाजपने समाधान अवताडे यांना उमेदवारी दिली आहे.

अजित पवारांनी स्वत: या निवडणूक प्रचारात उतरुन भाजपला धक्के देण्यास सुरुवात केली आहे. पोटनिवडणुकीच्या तोंडावर भाजप नेते कल्याण काळे यांनी अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.

पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघांची पोटनिवडणुक तोंडावर असताना कल्याण काळे यांचा राष्ट्रवादी प्रवेश भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे. आता पंढरपूर येथील मोहिते पाटील समर्थक संतोष नेहतराव आणि परिचारक गटाचे बांधकाम सभापती नगरसेवक सुरेश नेहतराव यांनी आज अजित पवार यांची भेट घेतली. मंगळवेढा येथे हुलजंती येथील सभेत ते राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता आहे.

अजित पवार हे 2 दिवसाच्या पंढरपूर दौऱ्यावर आहेत. मात्र अजित पवार यांनी पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीची प्रतिष्ठा पणाला लावली आहे. याआधी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी तीन वेळा पंढरपूरचा दौरा केला.

थोडक्यात बातम्या- 

देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ; गेल्या 24 तासातील आकडेवारी चिंताजनक

भयानक दृश्यं, महाराष्ट्रातील ‘या’ शहरात एकाचवेळी 22 कोरोना बाधितांवर अत्यसंस्कार

राज ठाकरेंचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन; केली ‘ही’ मागणी

पुण्यात आरोग्य आणीबाणी; ‘या’ तीन गोष्टींची मोठी कमतरता!

नगरच्या तरुणाची औरंगाबादमध्ये निर्घृण हत्या, हाताविना आढळला मृतदेह

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More