बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना मोठा झटका

मुंबई | मुंबईचे माजी पोलीस परमबीरसिंह (Parambir Singh) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) पत्र लिहीत राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर 100 कोटी वसूलीचे आरोप केले होते. त्यातच आता न्यायालयाने अनिल देशमुख यांच्या कोठडीमध्ये 27 डिसेंबरपर्यंत वाढ केली आहे. तसेच सचिन वाझेचा (Sachin Waze) चांदीवाल आयोगासमोर जबाब नोंदवण्यात आला आहे.

अनिल देशमुख यांनी पैशाची मागणी केली नाही, असा जबाब सचिन वाझेने न्यायालयात नोंदवला आहे. चांदीवाल आयोगाने (Chandiwal Commission) अनिल देशमुख यांना 50 हजारांचा दंड ठोठावला आहे. अनिल देशमुख यांचे वकिल गैरहजर असल्यामुळे हा दंड ठोठावण्यात आला आहे. सचिन वाझेदेखील उलट तपासणीवेळी गैरहजर होते. न्यायालयाने दंडाची रक्कम मुख्यमंत्री साहाय्यता निधीमध्ये वर्ग करण्याची सुचना केली आहे.

100 कोटी खंडणी जमा करण्याच्या आरोपावरून चांदीवाल आयोग अनिल देशमुख यांची चौकशी करत आहे. या प्रकरणाला वेगळे वळण लागले असून निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझेने अनिल देशमुख यांना क्लिन चिट देत त्यांनी कधीही पैशाची मागणी केली नाही, असं चांदीवाल आयोगासमोर म्हटलं आहे. अनिल देशमुख यांना क्लिन चिट मिळणार असल्याची चर्चा होती. मात्र, न्यायालयाने देशमुखांची 27 डिसेंबरपर्यंत कोठडी वाढवली आहे.

दरम्यान, मनी लाँड्रींग प्रकरणी अनिल देशमुख यांना ईडीकडून अटक करण्यात आली होती. सचिन वाझेने बार सुरळीत चालवण्यासाठी मुंबईतील बार मालकांकडून 4.7 कोटी उकळल्याचा आरोप करण्यात आला होता. तसेच परमबीर सिंह यांनी आरोप केल्यानंतर सीबीआयने अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. आता सचिन वाझेने अनिल देशमुख यांनी पैशाची मागणी केली नाही, असा जबाब दिल्याने 27 डिसेंबरनंतर अनिल देेशमुखांना क्लिन चिट मिळते का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या- 

सावधान! गुगलवर ‘या’ 5 गोष्टी शोधाल तर थेट जेलमध्ये जाल

पोस्टाची भन्नाट योजना! लहान मुलांचं खातं उघडल्यावर मिळणार दरमहा 2500 रुपये

“इथं कोणी ‘शहेनशहा’ टिकला नाही तर बाकी ‘शहांची’ काय गोष्ट”

उद्यापासून हिवाळी अधिवेशन सुरू; ‘या’ 10 मुद्द्यावरून अधिवशेन गाजणार?

“170 आमदारांच्या पाठिंब्याचा दावा पोकळ, ठाकरे सरकार कधीही अडचणीत येऊ शकतं”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More