भाजपला सर्वात मोठा धक्का! गोव्याच्या माजी मुख्यमंत्र्यांनी दिला राजीनामा
पणजी | देशात सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे. पाच राज्यांच्या विधानसभेसाठी पुढील महिन्यापासून प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रमाला सुरूवात होणार आहे. परिणामी विविध पक्षांनी आपापल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करायला सुरूवात केली आहे. यादी प्रसिद्ध होताच पक्षातील नाराजांची संख्या देखील वाढत आहे.
पाचपैकी चार राज्यात सध्या भाजपची सत्ता आहे. पण उत्तर प्रदेश, गोवा, उत्तराखंड या राज्यांमध्ये भाजपला दररोज धक्के बसत आहेत. नाराज नेत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. गोव्यात माजी मुख्यमंत्री दिवंगत नेेते मनोहर पर्रिकर यांच्या मुलानं भाजपला सोडचिठ्ठी दिली त्यानंतर लगेच माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पारसेकर यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे.
पक्षानं माझ्यावर अन्याय केला आहे. मी भाजपचा एक सदस्य म्हणून गोव्यात भाजप वाढवण्याचं काम केलं पण वरिष्ठ नेत्यांनी मला किंमत दिली नाही. परिणामी मी भाजपच्या प्राथमिक सदस्यपदाचा राजीनामा देत असल्याचं पारसेकर म्हणाले आहेत. पारसेकर हे 2014 ते 2017 दरम्यान गोव्याचे मुख्यमंत्री होते. मनोहर पर्रिकरांचे अत्यंत विश्वासू म्हणून त्यांनी काम केलं आहे.
दरम्यान, मनोहर पर्रिकरांच्या मुलाला डावलल्यानं आता भाजपच्या गोव्यात अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उत्पल पर्रिकर हे पणजी मतदारसंघातून अपक्ष लढणार आहेत.
थोडक्यात बातम्या –
“प्रशांत किशोर काॅंग्रेसमध्ये येणार होते पण…”, प्रियंका गांधींचा सर्वात मोठा खुलासा
लता मंगेशकर यांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती समोर!
मोदींच्या मंत्र्याचा अजब कारभार! दार बंद करून केली अधिकाऱ्याला मारहाण
KL Rahul ठरला IPL इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू; रक्कम ऐकून थक्क व्हाल!
“…म्हणून भाजपला दु:ख होतंय”, जयंत पाटलांचा खोचक टोला
Comments are closed.