मृुंबई | बॅालिवूड अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक राजीव कपूर यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं आहे. राजीव कपूर हे रणधीर कपूर अणि दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांचे छोटे बंधू आहेत.
राजीव कपूर यांनी वयाच्या 58 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. राजीव यांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना चेंबूरमधील इनलॅक्स या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
उपचारापूर्वीच राजीव कपूर यांचा मृत्यु झाला होता. याबाबत नीतू कपूर यांनी सोशल मीडीयावर पोस्ट शेअर केली आहे. राजीव यांच्या निधनानं संपूर्ण कपूर कुटुंबाला अणि बॅालिवूड सिनेसृष्टीला धक्का बसला आहे.
दरम्यान, राजीव कपूर हे त्यांच्या राम तेरी गंगा मैली आणि एक जान एक हम मधील भूमिकांसाठी प्रसिद्ध होते. आसमान, लव्हर बॉय, जबरदस्त, हम तो चले परदेस हे देखील त्यांचे विशेष गाजलेले चित्रपट आहेत. त्यानंतर राजीव कपूर यांनी त्यांचा मोर्चा दिग्दर्शन आणि निर्मितीकडे वळवला. ऋषी कपूर यांची प्रमुख भूमिका असणारा प्रेमग्रंथ हा चित्रपट देखील त्यांनी दिग्दर्शित केला होता.
View this post on Instagram
थोडक्यात बातम्या-
पंतप्रधान मोदी आम्हाला घाबारतात, हे त्यांना शोभत नाही- योगेंद्र यादव
गेहना वशिष्ठ अश्लील व्हिडीओ रॅकेटप्रकरणी मोठा खुलासा, बड्या अभिनेत्रीचा नवरा…
“…त्यावेळी गुलाम नबींना पराभूत करण्याचा प्रयत्न केला, मात्र…”; पवारांनी सांगितला ‘तो’ खास किस्सा
अश्रुजीवी!!! काॅंग्रेस नेत्याविषयी बोलताना पंतप्रधान मोदींना अश्रू अनावर
‘त्या’ आत्महत्या केलेल्या तरुणीचे मंत्र्यासोबत प्रेमसंबंध?; पोलीस काय म्हणाले???