बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘आयपीएल’आधी दिल्ली कॅपिटल्सला आणखी एक धक्का; ‘हा’ मोठा खेळाडू निघाला कोरोना पाॅझिटिव्ह

मुंबई | आयपीएलचा 14वा हंगाम येत्या 9 एप्रिलपासून सुरू होत आहे. सर्व संघ आयपीएलपूर्वी आपापल्या शिबीर कॅम्पमध्ये जोरदार तयारी करताना दिसत आहेत. तर काही खेळाडुंनी आयपीएलपूर्वी या हंगामातून माघार घेतली आहे. आयपीएल अवघे काही दिवस शिल्लक असताना दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का बसला आहे.

दिल्ली कॅपिटल्सचा फिरकीपटू अक्षर पटेल याला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे अक्षर या आयपीएल हंगामातील 7 ते 8 सामन्यांना मुकण्याची शक्यता आहे. मागील वर्षी दिल्लीचा कर्णधार राहिलेला श्रेयस अय्यर भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामन्यात खेळताना जखमी झाला होता. त्यानंतर तो या वर्षीची पुर्ण आयपीएल खेळणार नसल्याचं सांगितलं गेलं. तर त्यानंतर रिषभ पंतकडे दिल्ली कॅपिटल्सची जबाबदारी सोपवण्यात आली.

यावर्षी होणाऱ्या आयपीएलसाठी बीसीसीआयने 6 शहरांची निवड केली आहे. यावेळी, आयपीएलचे सामने मुंबई, बंगळूरु, चेन्नई, कोलकाता, अहमदाबाद आणि दिल्ली येथे सामन्यांचे आयोजन होणार आहे. मुंबईत मात्र प्रेक्षकांविना सामन्याच आयोजन होणार आहे. या वेळी राजस्थान राॅयल्स, सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्ज हे 3 संघ आपल्या घरच्या मैदानावर खेळू शकणार नाहीत.

दरम्यान, या हंगामात अनेक विदेशी खेळाडूंनी दांड्या मारल्या आहेत. कोरोना आणि बायो बबलची कारणे देऊन या वर्षी आयपीएल  न खेळण्याच ठरवलं आहे. तर यावर्षी देखील सामने प्रेक्षकांविना खेळवण्यात येणार आहे.

थोडक्यात बातम्या-

पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसंदर्भात शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय!

उद्धव ठाकरेजी, थोडा अभ्यास करत जा! चंद्रकांत पाटलांचा मुख्यमंंत्र्यांना टोला

‘काही द्यायचं नाही आणि नियम लावायचे’; पुण्यातील मिनी लॉकडाऊनला भाजपचा कडाडून विरोध

रुग्णसंख्या वाढली, कोरोना बळीही वाढले, कोरोनाचा कहर; ‘या’ देशात संपूर्ण लाॅकडाऊन घोषित

“…तर 30 एप्रिलपर्यंत कोरोनाची साखळी तोडणं शक्य आहे”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More