बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीचा आणखी एक धक्का!

नागपूर | अनिल देशमुख यांची 4 कोटी 20 लाख रुपयांची मालमत्ता जप्त केल्यानंतर ईडीने आज अनिल देशमुख यांच्या काटोल आणि वडविहिरा येथील निवासस्थानी छापे टाकले. ईडीने अनिल देशमुख यांचे काम पाहणारे त्यांचे दिवाणजी पंकज देशमुख यांनाही ताब्यात घेतलं.

आज सकाळी ईडीची दोन पथके अनिल देशमुख यांच्या नागपूर जिल्ह्यातील काटोल आणि नरखेड तालुक्यातील वडविहिरा येथील निवास्थानांवर दाखल झाली. वडविहिरा हे देशमुख यांचं मूळ गाव आहे. तिथे त्याची वडीलोपार्जित शेती आहे. छापे टाकल्यानंतर अधिक तपासासाठी ईडीच्या पथकाने देशमुख यांचे दिवाणजी पंकज देशमुख यांना ताब्यात घेतलं.

राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अनिल देशमुख यांची 4 कोटी 20 लाख रुपयांची मालमत्ता शुक्रवारी सक्तवसुली संचालनालयाने जप्त केली होती. त्यामुळे देशमुखांसह त्यांच्या कुटुंबीयांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात होती.

ईडीने जप्त केलेल्या मालमत्तेत मुंबईतील वरळी येथील 1 कोटी 54 लाखांचा निवासी फ्लॅट, रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील धुतूम गावातील 25 प्लॉट्सचा समावेश आहे. ईडीच्या या कारवाईनंतर अनिल देशमुख यांचे समर्थक संतप्त झाले असून, सुडबुद्धीने ही कारवाई करण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला

थोडक्यात बातम्या- 

लोकांना तीन-तीन वेळा इशारा दिला होता पण…- किशोरी पडणेकर

“…अन्यथा मुख्यमंत्र्यांना घराबाहेर पडू देणार नाही”

नरेंद्र मोदींसोबत झालेल्या भेटीत काय चर्चा झाली?, शरद पवार म्हणतात…

पुढील 24 तासात ‘या’ भागात अतिमुसळधार पावसाचा अंदाज; हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा

‘कोरोनामुक्त झालेल्यांना टीबीचा धोका’; आरोग्य मंत्रालयानं दिली महत्वाची माहिती

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More