मनसेला आणखी एक धक्का; पराभवानंतर ‘या’ नेत्याने घेतला मोठा निर्णय

Raj Thackeray Warns Opposition 

Raj Thackeray | विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीचा दणदणीत विजय झाला. तब्बल 230 जागांवर विजय मिळाला. तर महाविकास आघाडीला मात्र मोठा धक्का बसला. महाविकास आघाडीतील तीन प्रमुख घटक पक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गट मिळून केवळ पन्नास जागाच जिंकता आल्या.

महाविकास आघाडीला धक्का बसलाच मात्र त्याहून कितीतरी अधिक पटीनं राज ठाकरेंच्या मनसेला धक्का बसला. कारण मनसेला राज्यात खातं देखील उघडता आलं नाही.

गेल्यावेळी मनसेचा एक आमदार निवडून आला होता, मात्र यावेळी मनसेचे आमदार राजू पाटील यांचा देखील पराभव झाला. मनसेचा यावेळेस एकही आमदार निवडून आला नाही.

Raj Thackeray | राज ठाकरेंना धक्का

मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांचा देखील पराभव झाला. आता विधानसभा निवडणुकीतील अपयशानंतर मनसेला पुन्हा धक्का बसला आहे. अविनाश जाधव यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. फेसबुक पोस्ट करत अविनाश जाधव यांनी राजीनाम्याबाबत माहिती दिली.

विधानसभा निवडणुकीत ठाणे व पालघर येथे पराभवाची जबाबदारी घेऊन मी माझ्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहे. काम करताना माझ्याकडून कळत नकळत काही चूक झाली असल्यास आपण मला माफ करावे, अशी पोस्ट अविनाश जाधव यांनी फेसबुकवर केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

‘त्यांना फक्त व्हर्जिन मुली….’; अभिनेत्रीच्या खुलाशाने एकच खळबळ

सिंगल लोकांनी ‘या’ वेबसिरीज पाहूच नयेत!

गावातून पत्रकार परिषद घेत एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा!

“मी कॉमन मॅन म्हणून काम केलं”, अखेर एकनाथ शिंदेंनी सांगितलं सत्य

रोहित शर्माच्या मुलाचं नाव जाहीर!

Join WhatsApp

Join Now

संबंधित बातम्या

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .