उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का; ‘हा’ नेता शिवसेनेत प्रवेश करणार

Another Blow to Uddhav Thackeray, Leader Jitendra Janawale Resigns

Uddhav Thackeray | महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीला मोठे नुकसान सहन करावे लागत असून, महायुतीने जोरदार पुनरागमन केले आहे. महायुतीने भाजप (BJP), राष्ट्रवादी काँग्रेस – अजित पवार गट (NCP-Ajit Pawar) आणि शिंदे गटाच्या (Shiv Sena) एकत्रित 232 जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले. दुसरीकडे, महाविकास आघाडी (MVA) फक्त 50 जागांवरच थांबली, त्यामुळे त्यांच्यासाठी हा मोठा धक्का ठरला.

शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का, जितेंद्र जनावळे यांचा राजीनामा

शिवसेना (ठाकरे गट) पक्षाला विधानसभा निवडणुकीनंतर सुरू झालेली गळती थांबवता आलेली नाही. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना सतत धक्क्यावर धक्के बसत आहेत. आज पुन्हा एक मोठी बातमी समोर आली असून, शिवसेना ठाकरे गटाचे विलेपार्ले (Vile Parle) उपविभाग प्रमुख जितेंद्र जनावळे (Jitendra Janawale) यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे.

ते २० तारखेला शिवसेनेत (Shinde Group) प्रवेश करणार आहेत, असे सांगितले जात आहे. यामुळे महापालिका निवडणुका तोंडावर असताना ठाकरे गटाला आणखी एका पदाधिकाऱ्याची गळती सहन करावी लागत आहे.

राजीनाम्यापूर्वी उद्धव ठाकरेंना भावनिक पत्र

राजीनामा देण्यापूर्वी जितेंद्र जनावळे यांनी उद्धव ठाकरे यांना एक भावनिक पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी, “साहेब, मला माफ करा” असे म्हटले आहे. हा राजकीय निर्णय घेताना त्यांच्यावर मोठा ताण असल्याची चर्चा यामुळे सुरू झाली आहे.

ठाकरे गटाला सुरू असलेले धक्के

विधानसभा निवडणुकीनंतर ठाकरे गटातील अनेक पदाधिकारी आणि नेते शिंदे गटात सामील झाले आहेत. पुण्यातील काही नगरसेवकांनी आधीच शिवसेनेत प्रवेश केला आहे. छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) मध्ये देखील ठाकरे गटाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी पक्ष सोडला. शिवसेना ठाकरे गटाचे मोठे नेते राजन साळवी (Rajan Salvi) यांनीही शिंदे गटात प्रवेश केला आहे.
ही सुरू असलेली गळती उद्धव ठाकरेंच्या पक्षासाठी मोठे आव्हान बनली आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटासाठी ही परिस्थिती अधिक कठीण बनली आहे.

 Title : Another Blow to Uddhav Thackeray, Leader Jitendra Janawale Resigns

 

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .