बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राष्ट्रवादीचा माजी प्रदेश उपाध्यक्ष मंगलदास बांदलविरोधात आणखी एक गुन्हा दाखल

पुणे | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा माजी प्रदेश उपाध्यक्ष राहिलेला मंगलदास बांदल याच्याविरोधात लोणी काळभोर येथे पुणे ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. बंदुकीचा धाक दाखवून जमीन गहाणखत करून तब्बल पावणे सात कोटी रुपये परस्पर काढून घेतल्याच्या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, गंगाराम सावळा मासाळकर या 74 वर्षीय व्यक्तीची हवेली तालुक्यात जमीन आहे. त्या जमिनीचे बळजबरीने गहाणखत करून संबंधित व्यक्तीला गाडीत डांबून आरोपींनी तब्बल 6 कोटी 75 लाख रुपये काढून घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा माजी प्रदेश उपाध्यक्ष मंगलदास बांदल याच्यासह सचिन पलांडे, विकास भोंडवे, संदीप भोंडवे व शिवाजीराव भोसले बँकेतील एक अधिकारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 2013 पासून हा प्रकार घडत असल्याचं फिर्यादीने आपल्या तक्रारीत म्हटलं आहे.

बळजबरीने गहाणखत करून 6 कोटी 75 लाख रुपये परस्पर काढून घेतल्यानंतर आरोपींनी जमिनीवरील बोजा कमी करण्यासाठी तब्बल 1 कोटी रुपयांची मागणी केल्याचंही गंगाराम मासाळकर यांनी आपल्या तक्रारीत नमूद केलं आहे. लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुणे ग्रामीण पोलिस या प्रकरणात आणखी तपास करत आहे.

थोडक्यात बातम्या

15 टक्के फी कपातीविरोधात खासगी शाळा आक्रमक; सरकारला दिला ‘हा’ इशारा

ज्यांनी आपल्याला संपवण्याचा प्रयत्न केला त्यांना… – नाना पटोले

“नारायण राणेंची ओळख शिवसैनिक म्हणुनच; शिवसैनिक कधीच माजी होत नाही”

दादर रेल्वे स्थानकावर अचानक तरूणाने मारली महिलेला मिठी अन् पुढे घडला ‘हा’ प्रकार

सावधान! देशात कोरोनाचं संकट पुन्हा घोंगावतंय; वाचा चिंताजनक आकडेवारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More