अकोला | अहमदनगरचे प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे अनेकदा चर्चेत असतात. इंदुरीकर महाराजांनी आणखी एक वादग्रस्त वक्तव्य केल्याने ते पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे. कीर्तनाच्या क्लिप्स युट्यूबवर टाकणाऱ्यांविषयी इंदुरीकर महाराजांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.
कोट्यधीश झाले माझ्या नावावर, नालायकांना पैसा मोजता येईना. माझ्यावरच चढले आणि क्लिपा माझ्यावरच तयार केल्या असं म्हणत इंदुरीकर महाराजांनी कीर्तनाच्या व्हिडीओ क्लिप करून युट्यूबवर टाकणाऱ्या तरूणांना झापलं. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावडे यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात इंदुरीकर महाराज बोलत होते.
माझ्या जीवावर 4 हजार जणांनी युट्यूबकडून कोट्यवधी रूपये कमावले आहेत आणि याच लोकांनी मला अडचणीत आणलं, अशी तक्रार इंदुरीकर महाराजांनी केली आहे. यांचं वाटोळंच होणार, यांचं चांगलं होणार नाही, त्याचं पोरगं असं जन्माला येईल म्हणत इंदुरीकर महाराजांनी दिव्यांग शब्दाकडे निर्देश करणारे हातवारे केले.
दरम्यान, 2020 साली देखील इंदुरीकर महाराजांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. इंदुरीकर महाराजांच ते वक्तव्य देखील वादाच्या भोवऱ्यात सापडलं होतं. त्यानंतर इंदुरीकर महाराज यांनी युट्यूबर्सबद्दल केलेल्या या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
थोडक्यात बातम्या-
संजय राऊतांचं थेट पंतप्रधान मोदींना 13 पानी पत्र, म्हणाले…
पेट्रोल-डिझेल महाग म्हणून सीएनजी गाड्या घेतल्या, अशा लोकांना झटका देणारी बातमी
उत्तराखंडात आप ठरणार किंग मेकर, वाचा एक्झिट पोलचा अंदाज
‘…तरच युद्ध थांबेल’; रशियाच्या या नव्या चार अटींनी युक्रेनचं टेंशन वाढलं
“मी म्हातारा होईपर्यंत फडणवीस मुख्यमंत्री होत नाहीत”
Comments are closed.