मोठी बातमी! उद्धव ठाकरेंवर आणखी एक संकट

मुंबई | दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची नुकतीच भेट झाली. मात्र या भेटीत काय घडलं असेल, याचा भाजपने काढलेला अंदाज खरा ठरला तर उद्धव ठाकरेंना धक्का देणारी ही बातमी आहे.

दिल्ली सरकारच्या मद्यविक्री धोरणात गैरव्यवहार केल्याचा आरोप आम आदमी पार्टीचे नेते आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्यावर आहे. या आरोपांखाली सिसोदिया यांना सीबीआयने रविवारी चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. 

सिसोदिया यांच्या कोण-कोणत्या मद्यसम्राटांबरोबर लागेबांधे आहेत, याची तपासणी सीबीआय करत आहे. हा तपास करताना तत्कालीन महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंपर्यंत सीबीआयचे अधिकारी येऊ शकतात, असा संशय आशिष शेलार यांनी व्यक्त केला आहे.

मनिष सिसोदियांच्या दारू घोटाळ्याचे धागेदोरे महाराष्ट्रापर्यंत येत आहेत का? उद्धवजींचं सरकार त्या वेळेला मद्यविक्रेत्यांना ज्या खैराती वाटत होतं, त्यांचीही चौकशी होणार का, अशा शंका उपस्थित होत आहेत. त्या दिशेने चौकशी होऊ शकते, असं सूचक वक्तव्य आशिष शेलार यांनी केले.

ठाकरे गट हा कायदेशीर नाही. त्याला निवडणूक आयोगाची मान्यता नाही. निवडणूक आयोग, विधानपरिषद, सभा, न्यायालयानेही मान्यता दिलेली नाही. आताच्या निर्णयानुसार एकच शिवसेना आहे. त्याचे नेते एकनाथ शिंदे आहेत. दुसरा पक्ष अस्तित्वात आहे का, हाच प्रश्न आहे, असंही शेलार म्हणालेत.

महत्त्वाच्या बातम्या-

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More