बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

चिंताजनक! कोरोना विषाणूचा आणखी एक धोकादायक व्हेरिएंट सापडला

नवी दिल्ली | देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत काहीशी घट झाल्याचं पाहायला मिळत असलं तरी रुग्णवाढ आणि मृत्यूचं प्रमाण चिंताजनक आहे. त्यातच म्युकरमायकोसिस अर्थात ब्लॅक फंगस, यलो फंगस या आजाराने देशासह राज्यात शिरकाव केलाय. अशात सर्वांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे.

व्हिएतनाममध्ये कोरोना विषाणूचा आणखी एक घातक व्हेरिएंट सापडल्याचं समोर आलं आहे.  हा व्हेरिएंट भारत आणि इंग्लंडमध्ये आढणाऱ्या विषाणूपासून तयार झाला आहे, अशी माहिती व्हिएतनामच्या आरोग्यमंत्र्यांनी दिलीये.

जागतिक आरोग्य संघटनेकडून अद्याप यावर कोणतंही भाष्य करण्यात आलेलं नाही. व्हिएतनाममध्ये आतापर्यंत कोरोनाचे एकूण सात व्हेरिएंट आढळून आले आहेत. यामध्ये भारत व इंग्लंडमधील B.1.617.2 आणि B.1.1.7 व्हेरिएंटसचाही समावेश आहे.

दरम्यान, भारतात शनिवारी कोरोना रुग्णांच्या संख्येत विक्रमी घट होताना दिसली. देशात शुक्रवारी दिवसभरात 1 लाख 73 हजार 790 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 3 हजार 617 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 2 लाख 84 हजार 601 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

थोडक्यात बातम्या- 

“उद्धव ठाकरे पंतप्रधान झाले तर सोनिया गांधी आणि शरद पवारांनी त्यांच्या हाताखाली काम करावं”

भाजपला धक्का! ‘इतक्या’ नगरसेवकांनी भाजपची साथ सोडत बांधलं शिवबंधन

‘मोदी सरकारला गुजराती कंपन्यांची काळजी’; मुंबई उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला झापलं

10 सेकंद वाट पाहावी लागली तर आजपासून अजिबात टोल भरु नका!

2 कोटी रुपये जिंकण्याची संधी, ‘या’ सरकारी कंपनीची जबरदस्त ॲाफर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More