उद्धव ठाकरेंचा आणखी एक निर्णय एकनाथ शिंदेंकडून मागे, आरे मेट्रो कारशेडचा मार्ग मोकळा
मुंबई | मुंबईतील मेट्रो (Mumbai Metro) हा भाजपचा (BJP) महत्त्वकांक्षी प्रकल्प आहे. मात्र, ठाकरे सरकार (Yhackeray Goverment) सत्तेत आल्यानंतर तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) आरे येथील मेट्रो कारशेडवर (Aarey Metro Carshed) बंदी घातली होती. पर्यावरण प्रेमींनी आरे कारशेडला विरोध केल्याने उद्धव ठाकरेंनी आरे येथील कारशेडला स्थगिती दिली, परिणामी मेट्रोचं काम देखील रखडलं होतं.
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षानंतर ठाकरे सरकार पडलं व शिवसेनेतून (Shivsena) बाहेर पडलेल्या शिंदे गटानं भाजपच्या (BJP) पाठिंब्यानं शिंदे सरकार (Shinde Goverment) सत्तेत आणलं. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) स्थगितीचा निर्णय मागे घेत आरे कारशेडचा मार्ग मोकळा केला आहे.
ठाकरे सरकारनं सूचवलेली कांजूरमार्ग येथील पर्यायी जागा वादात आहे. त्या जागेवर आज काम सुरू केलं तरी चार वर्ष जातील. जोपर्यंत कारशेड पूर्ण नाही होत तोपर्यंत मेट्रो सुरू होणार नाही, असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी कारशेड आरे येथे होणार असल्याचं सुचवलं होतं. शिंदे सरकार सत्तेत येताच फडणवीसांनी याबाबत सूचक वक्तव्य केलं होतं.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मोठा निर्णय घेत आरे कारशेडवरील स्थगिती मागे घेतली आहे. मुख्यमंत्र्यांनी बंदी उठवल्यानंतर आता आरे कारशेडचं काम पुन्हा सुरू होणार आहे.
थोडक्यात बातम्या-
तसाच पाऊस आणि पडत्या पावसात तशीच सभा, शरद पवारांप्रमाणे आदित्य ठाकरेही लोकांची मनं जिंकणार?
चित्रा वाघ यांनी टाकलेल्या हॉटेलमधील ‘त्या’ व्हिडीओवरून नाना पटोले भडकले, दिला ‘हा’ गंभीर इशारा
राष्ट्रपती निवडणुकीचा आज निकाल, द्रौपदी मुर्मू 15 वर्षांपूर्वीप्रमाणे इतिहास रचणार?
शरद पवारांचा मोठा निर्णय, राष्ट्रवादीचे विभाग आणि सेल बरखास्त
‘या’ नऊ राज्यात कोरोनाचा फैलाव वाढतोय, केंद्रीय आरोग्य मंत्रालय अलर्ट मोडवर
Comments are closed.