बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! 24 तासात जम्मू-काश्मिरात आढळून आले 2 संशयास्पद ड्रोन

नवी दिल्ली | देशात कोरोनाचं महाभयंकर संकट समोर असताना यामध्ये आणखी एका संकटाची भर पडली आहे. जम्मू येथील भारतीय वायुदलाच्या हवाई तळावर दोन स्फोटके टाकण्यात आली आहेत. पाकिस्तानमधील दहशतवाद्यांनी पहिल्यांदाच मानवरहित ड्रोनचा वापर केला असल्याची शक्यता अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

सोमवारी 28 जून रोजी कालूचक मिलिट्री स्टेशनजवळ ड्रोन आढळला होता. त्यानंतर सोमवारी रात्री कुंजवानी-रत्नूचचक भाग आणखी एक ड्रोन आढळून आला असल्याची माहिती समोर आली आहे. तो ड्रोन मध्यरात्री दोन ते तीनच्या सुमारास आढळून आला असल्याचं बोललं जात आहे. 24 तासात दोनदा ड्रोन दिसून आल्यामुळे पुन्हा ड्रोन दिसल्यास तातडीने कारवाई करण्याचे आदेश त्याठिकाणच्या जवानांना दिले आहेत.

सलग दोन ड्रोन दिसल्यामुळे सुरक्षा यंत्रणा अधिक अलर्ट झाली आहे. तसेच कालकूच येथे ड्रोन आढळून आल्यामुळे कुंजवानी, पुरमंडळ मोड, बाडी ब्राम्हणा, रत्नूचक, राष्ट्रीय हायवे या भागात सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे. स्थानिक पोलीस आणि भारतीय सेनेच्या संयुक्त पथकाकडून  ठिकठिकाणी तपासणी केली जात आहे.

तसेच, सोमवारी रात्री जो ड्रोन आढळून आला. तो एक हाती होता की तीन हाती होता याविषयीचा तपास सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.  त्याचप्रमाणे भारतीय वायुदलाच्या हवाई तळावर दोन स्फोटके टाकण्यात आली त्यामध्ये भारतीय वायुदलाचे दोन जवान जखमी झाले असल्याचं समजत आहे.

थोडक्यात बातम्या-

“आता वाटायला लागलय मुख्यमंत्र्यानाच तिसरी लाट हवी आहे”

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबईतील एच एन रिलायन्स रुग्‍णालयात दाखल

‘…त्यामुळे ईडीने माझ्या विनंतीचा विचार करावा’; अनिल देशमुखांचं ईडीला पत्र

नशिबाचा खेळ! लग्नाला जाणारी वऱ्हाडीची गाडी कोसळली थेट दरीत

अबब ! रोहित शर्माच्या विकेटसाठी ‘टीम साऊथी’ने … ; शेन जर्गेसनचा मोठा खुलासा

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More