बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

एनसीबीची आणखी एक मोठी धाड; रेव्ह पार्टीतून अभिनेत्याच्या मुलासह 10 जण ताब्यात

मुंबई | सुशांत सिंहच्या प्रकरणानंतर अमली पदार्थांच्या छापेमारीत वाढ झालेली पहायला मिळत आहे. नुकतंच अमली पदार्थ  नियंत्रण कक्षानं शनिवारी रात्री मुंबईच्या समुद्रात सुरु असणाऱ्या एका रेव्ह पार्टीवर धाड टाकली. या पार्टीत ड्रग्स घेणाऱ्यांना अटक केली आहे.

शनिवारी टाकलेल्या धाडीत एनसीबीनं 10 जणांना ताब्यात घेतलं आहे. ड्रग्स पार्टी सुरू होताच एनसीबीनं धडक कारवाई सुरू केली. यात एका बॉलिवूड कलाकाराच्या मुलालाही ताब्यात घेण्यात आलं असल्याचं समोर आलं आहे. याशिवाय एका आयपीएस अधिकाऱ्यालाही ताब्यात घेतलं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

एनसीबीची ही कारवाई 7 तास गुप्तपणे सुरू असल्याचं समजतय. एनसीबीनं मोठ्या क्रूझवर केलेली ही पहिलीच मोठी कारवाई आहे. एनसीबीनं प्रवासी बनून क्रुझमधे प्रवेश केला. या पार्टीत उपस्थित लोक खुलेआम ड्रगचे सेवन करत असल्याचं निदर्शनास आल्यानं त्यांनी कारवाई सुरु केली.

दरम्यान, बाॅलिवूड अभिनेत्याचा मुलगा ड्रग्स प्रकरणात सापडल्यानं सध्या सगळीकडे संतापजक वातावरण पहायला मिळत आहे. तसेच पुन्हा एकदा बाॅलिवूड ड्रग्स कनेक्शन समोर आल्याचं पहायला मिळत आहे.

थोडक्यात बातम्या –  

“विधानसभा निवडणूक कधीही होवो, स्वबळावर जिंकण्यास भाजप सज्ज”

‘…तर शेतकरी तुमच्या उरावर बसल्याशिवाय राहणार नाही’; राजू शेट्टींचा सरकारला इशारा

IPL 2021: एकाच दिवशी मुंबईला दोन धक्के, सामना तर गमावलाच पण…

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी; ठाकरे सरकारमधील मंत्र्याने दिली महत्वाची माहिती

सरकारने एअर इंडियाबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतला नाही- पीयूष गोयल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More