बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

धोनीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा, माहीकडे आता नवी जबाबदारी!

नवी दिल्ली | भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आपल्या अनुभवाचा फायदा आता एनसीसीला देणार आहे. त्याचं कारण असं की, भारतीय संरक्षण मंत्रालयाने महेंद्रसिंग धोनी आणि प्रसिद्ध उद्योजक आनंद महिंद्रा यांची एनसीसीला चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करण्यासाठी उच्चस्तरीय समितीवर सदस्य म्हणून नेमणूक केली आहे.

बदलणाऱ्या काळात अधिक समर्पक होण्यासाठी एनसीसीच्या अभ्यासासाठी बैजयंत पांडा यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. या समितीमध्ये महेंद्रसिंग धोनी, जामियाचे कुलगुरू नजमा अख्तर, खासदार विनय सहस्त्रबुद्धे, माजी मंत्री राजवर्धनसिंग राठोड, आर्थिक सल्लागार संजीव सन्याल आणि आनंद महिंद्रा यांची निवड करण्यात आली आहे.

देशात एनसीसीची स्थापना ही 16 जुलै 1948 रोजी एनसीसीच्या कायद्याप्रमाणे करण्यात आली आहे. युवकांना सक्षम, सुरक्षित आणि शिस्तीची जाण व्हावी, यासाठी स्थापना केली होती. शाळा आणि महाविद्यालयातील युवकांना एनसीसीमध्ये सामील होता येतं.

दरम्यान, एनसीसीच्या समिती सदस्यपदी महेंद्रसिंग धोनीची नेमणुक झाल्यावर त्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवलाय. महेंद्रसिंग धोनीने आता आयपीएल वगळता सर्व क्रिकेटमधून विश्रांती घेतली आहे.

थोडक्यात बातम्या –

जागतिक बँकेचा तालिबानला दणका! बँकेच्या ‘त्या’ निर्णयामुळे तालिबान्यांचं झालंय अवघड

पुणे कोरोना अपडेट; जाणून घ्या आजची आकडेवारी एका क्लिकवर

राज्याच्या कोरोना रूग्णांच्या आकडेवारीमध्ये चढ-उतार, जाणून घ्या आजची आकडेवारी!

“शिवसेनेला वाचवायचं असेल तर उद्धव ठाकरेंनी सरकारच्या बाहेर पडायला हवं”

मुंबईचा जगभरात डंका! प्रामाणिकपणाच्या सर्वेक्षणात पटकावला दुसरा क्रमांक

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More