मोठी बातमी! शिंदे सरकारने घेतला आणखी एक महत्त्वाचा निर्णय

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | शिंदे सरकारने आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. स्वातंत्र्य सैनिकांना मिळणाऱ्या लाभांप्रमाणे हुतात्म्यांच्या वारसांना लाभ देण्याचा निर्णय तत्कालीन सरकारने घेतला होता. त्यावेळी 1,000 रुपये मासिक निवृत्तीवेतन देण्यात येत होतं. आता यात वाढ करण्यात आली आहे.

ही वाढ 1 नोव्हेंबर 2022 पासून लागू करण्यात आली आहे. निवृत्तीवेतन लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना मिळणारा प्रवासखर्च व इतर आर्थिक सवलती पूर्वीप्रमाणेच राहतील. त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. तसा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

स्वातंत्र्यसैनिकांना मिळणाऱ्या निवृत्तीवेतनात वाढ झाल्यास सीमा आंदोलनातील हुतात्म्यांच्या वारसांनाही वाढीव निवृत्तीवेतन मंजूर करण्यात येते.

शिंदे फडणवीस सरकारने 22 नोव्हेंबर 2022 रोजी शासन निर्णय जारी करत स्वातंत्र्य सैनिकांना देण्यात येत असलेल्या 10,000 दरमहा इतक्या निवृत्तीवेतनात आणखी 10,000 रुपयाची वाढ केली.

स्वातंत्र्य सैनिकांना आता दरमहा 20,000 इतके निवृत्तीवेतन देण्यात येत आहे. याच धर्तीवर राज्य शासनाने महाराष्ट्र-कर्नाटक सीमा आंदोलनातील हुतात्म्यांच्या कुटुंबियांनाही स्वातंत्र्य सैनिकांप्रमाणेच वाढीव निवृत्तीवेतन देण्याचा निर्णय घेतला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-