श्रीनिवास वनगा यांच्यानंतर शिंदे गटाचा आणखी एक नेता नॉट रिचेबल!

Mumbai | पालघर विधानसभा मतदारसंघाचे शिंदे गटाचे (Eknath Shinde) विद्यमान आमदार श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी न मिळाल्याने ते नाराज झाले होते. त्यांची उमेदवारी वगळताच ते बेपत्ता झाले होते. यानंतर महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली होती.

श्रीनिवास वनगा यांना शिवसेनेने उमेदवारी नाकारल्यानंतर ते अज्ञातस्थळी गेले होते. चार दिवस बेपत्ता राहिल्यानंतर परतले. सोबत बॉडीगार्ड नव्हते. वनगा कुठे होते कुणालाच माहित नव्हतं. अशात आता आणखी एक नेता नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर आली आहे.

Eknath Shinde | आणखी एक नेता नॉट रिचेबल

शिवसेना शिंदे गटाचे (Eknath Shinde) आदिवासी राज्य संघटक आणि कोकण पाटबंधारे विकास महामंडळाचे माजी उपाध्यक्ष जगदीश धोडी मागील तीन दिवसांपासून नॉट रिचेबल आहेत. जगदीश धोडी यांनी बोईसर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार विलास तरे यांच्याविरोधात बंडखोरी करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

पालघर जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला आलेल्या दोन जागांवर शिवसेना शिंदे गटाने दोन्ही ठिकाणी भाजपमधून आयात केलेल्या उमेदवारांना संधी दिली.

ऐनवेळी शिवसेनेत आलेल्या उमेदवारांना संधी मिळाल्यानं पालघरमधील स्थानिक शिवसैनिकांमध्ये नाराजी आहे.  बंडखोर जगदीश धोडी तीन दिवसांपासून नॉट रिचेबल असल्याने महायुतीची डोकेदुखी वाढली आहे.

महायुतीचं टेन्शन वाढलं?

येत्या चार डिसेंबरपर्यंत उमेदवारांना आपला उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. मात्र यावेळी महायुतीमध्ये अनेक विधानसभा मतदारसंघात नाराज इच्छुकांनी बंडखोरी केल्याचं चित्र आहे. या बंडखोरीचा फटका हा निवडणुकीला मोठ्या प्रमाणात बसू शकतो.

महत्त्वाच्या बातम्या- 

देवेंद्र फडणविसांच्या जीवाला धोका?, सुरक्षेत करण्यात आली मोठी वाढ

शरद पवारांचा महायुतीवर आतापर्यंतचा सर्वात गंभीर आरोप; म्हणाले..

विधानसभेत महाविकास आघाडी मारणार बाजी?, सर्व्हेतून मोठी माहिती समोर

दिवाळी पाडव्याला मिळाली आनंदवार्ता, सोनं झालं स्वस्त; पाहा आजचे दर

बारामतीत दोन ठिकाणी पाडवा साजरा होणार?; पार्थ पवारांकडून मोठा खुलासा