Top News

मराठा आरक्षणासाठी आणखी एका तरूणाची गळफास घेऊन आत्महत्या!

लातूर | मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी आत्महत्या सत्र सुरूच आहे. लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील हिप्परगा येथील तरूणानं आपल्या मामाच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नितीन पांडुरंग घोगरे असं या तरुणाचं नाव आहे.

नितीन घोगरे याचे शिक्षण एम.कॉम. पर्यंतचे झाले आहे. मराठा समाजाला आरक्षण नसल्याने त्याला नोकरी मिळत नव्हती, म्हणून त्याने आत्महत्या केली असल्याचं गावकऱ्यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, मराठा आरक्षणासाठी कायद्यानं लढू मात्र कोणीही आत्महत्या करू नका, असं आवाहन सकल मराठा समाजाकडून करण्यात येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-MIM नगरसेवकाला 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी!

-महिला कुस्ती स्पर्धेत विनेश फोगटनं मिळवलं पहिलं सुवर्ण!

-सनातनचे प्रमुख जयंत आठवलेंना अटक करा- राधाकृष्ण विखेंची मागणी

-… तर संसदेत कायदा करू आणि राममंदिर बनवू!

-…म्हणून भावी बायकोनं नवऱ्या मुलाला विषारी चाॅकलेट देऊन संपवलं!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या