बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

निशादची ऐतिहासिक कामगिरी; उंंच उडीत पटकावलं सिल्वर मेडल

टोकियो | जपानच्या टोकियो शहरात ऑलिम्पिक स्पर्धा भरवण्यात आल्या होत्या. टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने ऐतिहासिक कामगिरी करत 7 पदकं आपल्या नावावर केली. त्यानंतर आता टोकियोमध्ये पॅराऑलिम्पिक स्पर्धेला सुरूवात झाली आहे. त्यात भारताने आता दुसरं पदक आपल्या खिश्यात घातलंं आहे.

पुरुषांच्या T47 गटाची उंच उडी स्पर्धा घेण्यात आली. यात 2 भारतीय खेळाडूंनी भाग घेतला होता. उंच उडी स्पर्धेमध्ये भारताच्या निशाद कुमार याला रौप्यपदक मिळालं आहे. फायनलमध्ये निशाद कुमारने 2.06 मीटर लांब उडी मारली आणि दुसरा क्रमांक पटकावला आहे. 2.06 मीटर लांब उडी मारत निशादने आशियाई रेकॉर्डशी देखील बरोबरी केली आहे.

उंच उडी स्पर्धेत भारताच्या रामपालने देखील भाग घेतला होता. मात्र, तो 5व्या स्थानी राहिला. पॅरालिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकणारा निशाद कुमार तिसरा भारतीय ठरला आहे. आजच भारतीय टेबल टेनिसपटू भाविना पटेलने महिला एकेरीत रौप्यपदक पटकावलं आहे.

दरम्यान, याआधी 2016 मध्ये दीपा मलिकनं देखील रौप्यपदक पटकावलं होतं. तिने गोळाफेक स्पर्धेत 4.61 मीटर थ्रो करत ही कामगिरी केली होती.

थोडक्यात बातम्या-

“भाजप मनसे युती होणं अशक्य, भाजपला मनसेची काय गरज?”

अखेर ‘त्या’ शेतकऱ्याचा मृत्यू; देशभरात संतापाची लाट

राज्यातील शाळा सुरू होणार?; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचं मोठं वक्तव्य

रामाशिवाय अयोध्या नाहीच, अयोध्या आहे जिथं राम – राष्ट्रपती रामनाथ कोविंद

‘खाकीतील ‘या’ दरोडेखोराच्या मुसक्या आवळणं गरजेचं’; हसन मुश्रीफांचा हल्लाबोल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More