Top News

ठाकरे सरकारमधील आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण!

मुंबई | ठाकरे सरकारमधील आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण झाली आहे. कामगार व राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे.

दिलीप वळसे पाटील यांनी स्वत: ही माहिती दिली आहे. नुकतीच माझी कोरोना चाचणी करण्यात आली असून, त्याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचं दिलीप वळसे पाटील यांनी सांगितलं आहे.

माझी प्रकृती उत्तम असून कसलाही त्रास नाही. खबरदारीचा उपाय म्हणून मी डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेत आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी दक्षता म्हणून कोरोनाची चाचणी करून घ्यावी, असं आवाहन वळसे पाटील यांनी केलंय.

दरम्यान. आपल्या सर्वांच्या सदिच्छा व आशीर्वाद यांच्या बळावर मी लवकरात लवकर पुन्हा आपल्या सेवेत रुजू होईन, असं दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

“जेव्हा पोरं निकम्मी असतात, तेव्हा म्हाताऱ्या बापाला बाहेर फिरावं लागतं”

“उद्धव ठाकरेंना कशाला भेटायचं, शरद पवारच सरकार चालवत आहेत”

गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांचं निधन

“मी खुर्चीत बसतो, सत्ता चालवण्याचं कंत्राट तुम्ही घ्या”

भारत 2024 पर्यंत 5 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचं लक्ष्य पूर्ण करणार- नरेंद्र मोदी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या