धनंजय मुंडेंच्या समर्थकाच्या हत्येनंतर 24 तासात बीडमध्ये आणखी एक हत्या

बीड | विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचे कट्टर समर्थक पांडुरंग गायकवाड यांच्या हत्येनंतर 24 तासात बीडमध्ये आणखी एक हत्या झाली आहे. 

अजय भोसले या तरुणाची हत्या झाल्याचे उघड झाले आहे. 24 तासात बीड जिल्हा दोन हत्यांनी हादरला आहे. अजय भोसले या तरुणाची हत्या करुन त्याचा मृतदेह पुरण्यात आला होता.

दोन्ही हत्येमागील विशेष बाब म्हणजे पांडूरंग गायकवाड यांच्या हत्येशी अजय भोसले हत्या प्रकरणाचा संबंध असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यामुळे दोन्ही हत्यांचे गुढ वाढले आहे.

दरम्यान, परळीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविकेचे पती पांडुरंग गायकवाड यांची ओव्हर ब्रिजच्या खाली धारदार शस्त्राने हत्या झाली.

महत्वाच्या बातम्या-

-भंडारा-गोंदियात राष्ट्रवादीच्या विद्यमान खासदाराचा पत्ता कट, ‘यांना’ दिली उमेदवारी!

-भाजपला फटका ‘या’ नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश

-तलवारीने चेहऱ्यावर सपासप वार करुन धनंजय मुंडेंच्या समर्थकाची हत्या

-चौकीदारानेच देश खाल्ला; शरद पवारांचा मोदींवर घणाघात 

-देवेंद्रजी मला तुमचा अभिमान वाटतो, तुम्ही दिलेला शब्द पार पाडला- उद्धव ठाकरे