बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आणखी एका राष्ट्रवादीच्या नेत्याकडून महिलेवर लैंगिक अत्याचार- तृप्ती देसाई

मुंबई | भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी एक फेसबूक पोस्ट करत खळबळ उडवून दिली आहे. आणखी एका राष्ट्रवादीच्या नेत्याकडून महिलेवर लैंगिक अत्याचार झाल्याचा गौप्यस्फोट तृप्ती देसाई यांनी फेसबूक पोस्टद्वारे केला आहे.

आणखी एका राष्ट्रवादीच्या नेत्याकडून लग्नाचं, नोकरीचं अमिष दाखवून एका महिलेवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा खळबळजनक आरोप भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी केला आहे.

पीडितेसह 12 वाजता पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती तृप्ती देसाईं यांनी दिली आहे. तसेच तृप्ती देसाई या पत्रकार परिषदेमध्ये संबंधित नेत्याचं नाव जाहीर करणार असल्याची असल्याची माहिती आहे.

दरम्यान, यापूर्वी धनंजय मुंडे, मेहबूब शेख तसेच शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री संजय राठोड यांच्यावर झालेल्या आरोपांमुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत आलं होतं.

थोडक्यात बातम्या- 

“शिवसेना मी घराघरात पोहोचवली, मीच स्वत: राजीनामा देणार होते”

“पवार साहेबांच्या तब्येतीसंदर्भात विकृत पोस्ट करणाऱ्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही”

उद्धव ठाकरेंना फोन करून नरेंद्र मोदींनी केली रश्मी ठाकरेंच्या तब्येतीची विचारपूस!

केंद्र सरकारचा सर्वसामान्यांना मोठा दिलासा; ‘हा’ निर्णय घेतला मागे

आमचा पक्ष भाजपसारखा नाही, दिलेली आश्वासने पाळण्याचा काँग्रेसचा इतिहास आहे- राहुल गांधी

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More