बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मराठा आरक्षणासाठी विष घेतलेल्या मराठा आंदोलकाचा मृत्यू

औरंगाबाद | मराठा आरक्षणासाठी विष घेतलेल्या आणखी एका मराठा आंदोलकाचा मृत्यू झाला आहे. जगन्नाथ सोनवणे असं या 50 वर्षीय आंदोलकाचं नाव आहे. 

देवगाव रंगारी येथे रास्तारोको आंदोलनात दोघांनी विषप्राशन केलं होतं. जयेंद्र सोनवणे आणि जगन्नाथ सोनवणे अशी त्यांची नावं असून त्यांना उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. 

दरम्यान, जगन्नाथ यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे काकासाहेब शिंदेनंतर मराठा आरक्षणासाठी गेलेलं हे दुसरं बलिदान आहे. 

महत्त्वाच्या बातम्या–

-मराठा आरक्षणाचा प्रश्न कसा सोडवाल?, शरद पवारांचं मुख्यमंत्र्यांना मार्गदर्शन

-मराठा समाजाबद्दल कसल्याही प्रकारचं बेजबाबदार वक्तव्य केलेलं नाही!

-मराठा आक्रमक; ठाण्यात रस्तारोकोसाठी रोडवर टायर पेटवले

-मराठा समाजाच्या असंतोषाला देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील जबाबदार!

-लोक सूर्याजी पिसाळ म्हणून हिणवत आहेत; भाजप जिल्हा उपाध्यक्षाचा राजीनामा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More