बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आणखी एक पवार अडचणीत येणार?, भाजप नेत्याच्या दाव्याने खळबळ

मुंबई | राष्ट्रवादीचे दोन बडे नेते सध्या तुरूंगात आहेत. माजी गृहमंत्री अनिल देशमुख, माजी अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यानंतर राष्ट्रवादीचा आणखी एक बडा नेता अडचणीत येणार असल्याचा इशारा भाजप नेते मोहित कंबोज यांनी दिला होता.

मोहित कंबोज यांनी हा इशारा दिल्यानंतर आता आणखी एक ट्विट केलं आहे. देशमुख आणि मलिकांनंतर आता राष्ट्रवादीचे नेते व आमदार रोहित पवार अडचणीत येणार असल्याचे स्पष्ट संकेत कंबोज यांनी दिलेत.

बारामती अॅग्रो लिमिटेड स्टार्ट अपसाठी केस स्टडी आहे! मी वैयक्तिकरित्या या कंपनीच्या उपलब्धींचा अभ्यास करण्यास सुरुवात केली आहे! यामागची यशोगाथा समजून घेण्यासाठी तरुणांना मदत करणारा संक्षिप्त अभ्यास लवकरच शेअर करणार आहे, असं ट्विट करत कंबोज यांनी रोहित पवारांना टॅग देखील केलंय. त्यामुळे आता रोहित पवार अडचणीत येणार का? असा प्रश्न उपस्थित होतोय.

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More