बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राष्ट्रवादीतील प्रस्थापितांना दे धक्का, जयंत पाटलांच्या आणखी एका नातेवाईकाला मोठं पद!

अहमदनगर | राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचं अहमदनगर जिल्ह्यावर लक्ष असल्याचं दिसत आहे. या जिल्ह्यातील राहुरी मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार आणि जयंत पाटलांचे भाचे प्राजक्त तनपुरे यांना मंत्रिपद दिलं आहे. अशातच त्यांच्या आणखी एका नातेवाईकाला मोठं पद देण्यात आलं आहे. नगर जिल्ह्यात राष्ट्रवादीचे अनेक निष्ठावंत असून त्यांचं पक्षासाठी मोठं योगदान आहे. अशांना डावलून नातेवाईकाची मोठ्या पदावर वर्णी लावली आहे.

लाखोंपेक्षा अधिक भाविकांचे श्रद्धास्थान असलेले शिर्डीतील साईबाबा आणि पंढरपुरमधील विठ्ठल रुक्मिणी मंदिर संस्थानच्या विश्वस्तपदावर वर्णी लागण्यासाठी राजकीय मंडळींकडून फिल्डिंग लावण्यात येत होती. यामध्ये साई संस्थान, पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी संस्थान विश्वस्तपदाबाबत निर्णय घेण्यात आला. नगर जिल्ह्यात राष्ट्रवादीचे अनेक निष्ठावंत आहेत मात्र त्यांना डावलून मात्र शिवसेनेतून राष्ट्रवादीत आलेल्या आशुतोष काळेंना हे पद देण्यात आलं आहे.

जयंत पाटील यांच्या दोन्ही बहिणी नगर जिल्ह्यात आहे. खासदार प्राजक्त तनपुरे यांच्या पत्नी उषा तनपुरे आणि माजी आमदार नरेंद्र घुले यांच्या पत्नी नीलिमा घुले या जयंत पाटलांच्या बहिणी आहेत. नरेंद्र घुले हे चंद्रशेखर घुले यांचे भाऊ आहेत. चंद्रशेखर यांची मुलगी चैताली या आशुतोष काळे यांच्या पत्नी आहेत.

दरम्यान,  शिर्डी साईबाबा संस्थान अध्यक्षपद राष्ट्रवादीला तर विठ्ठल रुक्मिणी देवस्थान पंढरपूर काँग्रेसच्या पारड्यात गेलं. आशुतोष काळे यांच्याकडे शिर्डी साई संस्थानचं अध्यक्षपद देण्यात आलं आहे. त्यांची निवड झाल्यावर कोपरगावमध्ये फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.

थोडक्यात बातम्या- 

‘आता एवढा माज आला का?’; शहनाझचा ‘हा’ व्हिडीओ पाहून भडकले चाहते

‘…तर आमचा उमेदवार हरला तरी आम्हाला पर्वा नाही’; जि.प. पोटनिवडणुकीबाबत फडणवीसांंचं मोठं वक्तव्य

सलाम कोल्हापूरांना! कोरोना काळात अहोरात्र मेहनत घेणाऱ्या खऱ्या हिरोंच्या कौतुकासाठी केला हा खास उपक्रम

आशा सेविकांसाठी आनंदाची बातमी! मानधनात वाढ आणि कोविड भत्ताही मिळणार, राज्य सरकारचा निर्णय

कोरोनायोद्धा म्हणण्यापेक्षा आमच्या मागण्या मान्य करा म्हणत परिचारिकांचं आंदोलन!

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More