मुंबई | एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाच्या बंडानतर शिवसेनेची डोकेदुखी वाढली आहे. पक्षप्रमुख ठाकरेंना रोज नवे नवे हादरे बसत आहेत. ज्यांना जायचं त्यांनी जावं, ठाकरेंनी सांगितलं होतं. त्यांनंतर अनेक नेत्यांनी शिंदे गटाची वाट धरली. शिवसेनेची गळती अजूनही चालू आहे. पुन्हा एकदा शिवसेनेच्या गटातून एका माजी खासदाराने राजीनामा दिला आहे.
शिवसेनेचे माजी खासदार आंनदराव अडसूळ यांनी गटनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. ते अमरावतीचे माजी खासदार आहेत. पुर्वीच्या निवडणुकीत ते खासदार नवनीत राणा यांच्या विरोधात उभारले होतो. त्यावेळी त्यांनी हार पत्करावी लागली होती. त्यांचा या निर्णयामुळे ते शिंदे गटात जाणार का?, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांचा या राजीनाम्यामुळे शिवसेनेला (Shivsena) पुन्हा एक धक्का बसला आहे.
आनंदराव अडसूळ हे सध्या ईडीच्या (ED) ताब्यात आहेत. त्यांच्या घरावर ईडीकडून छापे टाकण्यात आले आहेत. अनेकदा त्यांना चौकशीसाठी बोलवण्यात आलं आहे. त्यांच्या घरातून मोबाईल, लॅपटाॅप अनेक कागदपत्रे ताब्यात घेण्यात आले आहेत. ईडी आणि सीबीआयची भिती दाखवत या आमदारांना भाजप आपल्या गटात ओढत आहे, असा आरोप शिवसेना करत आहे.
विधानसभा अध्यक्ष निवडणुकीत भाजप (BJP) आणि शिंदे गटाचा विजय झाला. त्या दिवशी शिवसेनेत सोबत असणारे संतोष बांगर अचानक दुसऱ्या दिवशी शिंदे गटाला जाऊन मिळाले. बहुमत चाचणीवेळी त्यांनी शिवसेनेविरूद्ध मत दिलं. यामुळे हा एक धक्का शिवसेनेसाठी होता. बहुमतचाचणीत ही शिंदे सरकारचा विजय झाला.
थोडक्यात बातम्या
मुंबईकरांसाठी पुढील 5 दिवस महत्त्वाचे; हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा
धक्कादायक! हॉटेलमध्ये पोळी लाटताना कर्मचाऱ्याने केलं ‘हे’ कृत्य
उद्धव ठाकरेंभोवतालच्या ‘त्या’ कोंडाळ्यात कोणते नेते?, शहाजीबापू पाटलांनी यादीच सांगितली
सावधान! व्हॉट्सअॅप वापरताय तर ‘या’ गोष्टीचं पालन अनिवार्य, अन्यथा होऊ शकते कारवाई
शिंदे गटाचं समर्थन भावना गवळींच्या अंगलट?, शिवसेनेनं प्रतोद पदावरून केली उचलबांगडी
Comments are closed.