बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘सचिन वाझे शिवसेनेचे वसुली एजंट’; देवेंद्र फडणवीसांकडून आणखी धक्कादायक आरोप

मुंबई | मनसुख हिरेन आत्महत्या प्रकरणाचा तपास करणारे पोलीस दलातील अधिकारी सचिन वाझे यांना निलंबित केलं आहे. प्रकरणाचा तपास करणार अधिकारी वाझेंनाच अटक झाल्यामुळे विरोधकांनी यावरून सरकारवर टीका केली. याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर निशाणा साधत खोचक अशी टीका केली आहे. दिल्लीमध्ये ते माध्यमांशी बोलत होते.

सचिन वाझे यांचे शिवसेनेशी घनिष्ठ संबंध होते तर निलंबित असतानाही वाझे शिवसेनेचे प्रवक्ते म्हणून वावरत होते. सचिन वाझेंनी शिवसेनेत प्रवेश केला त्यातून बिझनेस रिलेशन तयार झालं आणि त्यावेळी त्यांनी नेत्यांसोबत मिळून कंपन्या तयार केल्या. मी मुख्यमंत्री असताना शिवसेनेने वाझेंना कामावर परत घेण्यासाठी माझ्यावर दबाव टाकला होता. सचिन वाझेवर खंडणीची केस चालली आहे. वसई आणि विरारमधील खंडणी रॅकेटमध्ये त्यांचा समावेश असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं.

सचिन वाझेंचं इतकं खराब रेकॉर्ड असताना क्राईम इंटेलिजन्स युनिटमध्ये सचिन वाझेंना घेतलं. मात्र हे पोलीस निरीक्षकाचं पद आहे परंतू एपीआयला घेतलं गेलं. कोणतीही केस सीआययू कडे येते आयुक्तानंतर सचिन वाझेंचं पद मोठं होतं. मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद, शिवसेना मंत्र्यांसोबत वाझे दिसत होते. वाझे वसूली अधिकाऱ्याच्या रूपाने बसवले गेले असल्याचं म्हणत फडणवीसांनी शिवसेनेवर टीका केली आहे.

दरम्यान, या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने वरिष्ठ अधिकाऱ्यांची बदली केली आहे. यामध्ये मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची बदली झाली असून हेमंत नगराळे नवे मुंबई पोलीस आयुक्त असणार आहेत. तर परमबीर सिंह यांच्याकडे गृह रक्षक दलाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यासोबतच संजय पांडे यांच्याकडे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

थोडक्यात बातम्या- 

महिला फाटलेल्या जीन्स घालतात हे बरोबर आहे का?; भाजपच्या मुख्यमंत्र्याचा सवाल

भारताचा पराभव विराट कोहलीच्या जिव्हारी, ‘हा’ मोठा निर्णय घेण्याची शक्यता

झोमॅटो बाॅय प्रकरणात तनुश्री दत्ताची एंट्री, परिणीती चोप्राला तनुश्रीचा सवाल, म्हणाली…

‘एखाद्या वावटळीत पोलीस दलाची…’; परमबीर सिंग यांच्या बदलीवर संजय राऊतांचं ट्विट

धक्कादायक! मुलाला घेऊन घरी जात होती महिला अन् अचानक कारवर येऊन कोसळलं विमान, पाहा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More