बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मास्क किती दिवस लावायचं???; नीती आयोगाने दिलं स्पष्टीकरण

नवी दिल्ली | जगभरात पसरलेल्या कोरोना महामारीमुळे प्रशासनाने अनेक बंधन लादली आहेत. सोशल डिस्टन्सिंग राखणं, मास्क लावणं, अशा अनेक नियमांचं पालन करणं गरजेचं आहे. मात्र आता लोक मास्क लावण्यासाठी टाळाटाळ करताना दिसत आहे. परंतू तरीसुद्धा आणखी काही काळ मास्क लावणं गरजेचं असल्याचं नीती आयोग सदस्य डाॅ. व्ही. के. पाॅल यांनी सांगितलं आहे.

पुढील काही काळ नाही तर पुढच्या वर्षापर्यंत मास्क घालणं गरजेचं असल्याचं डाॅ. पाॅल यांनी सांगितलं आहे. याबाबत बोलताना मास्क परिधान करणं आता बंद होणार नसून कोरोनाची तिसरी लाट नाकारता येणार नसल्याचंही पाॅल म्हणाले आहेत.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत तसेच मास्कबाबत भाष्य करत असताना कोरोनाचा लढा आता केवळ शिस्त, लस आणि प्रभावी औषधांद्वारे जिंकला जाऊ शकतो. पुढील तीन-चार महिने अत्यंत महत्त्वाचे असल्याचं पाॅल यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, डाॅ. पाॅल यांनी दिलेल्या माहितीनुसार, आगामी उत्सावांमध्ये सुरक्षा कमी करण्याबाबत सावधगिरी बाळगण्यात यावी नाहीतर संसर्ग मोठ्या प्रमाणात पसरु शकतो. कोरोनाची दुसरी लाट सध्या देशभर पसरत आहे. जर व्यवस्थितपणे काळजी घेतली तर तिसऱ्या लाटेचा धोका कमी होईल, असं सांगितलं.

थोडक्यात बातम्या-

महाराष्ट्राला तालावर नाचवणाऱ्या ‘शांताबाई’ फेम गायकाची राजकारणात एन्ट्री, ‘या’ पक्षात करणार प्रवेश!

कोरोनामुळे तरुणांच्या फुफ्फुसांवर परिणाम???, संशोधनातून महत्वाची माहिती समोर!

“मोदी सर्वोच्च न्यायालयाचं पण ऐकणार नाहीत मग कोणाचं ऐकणार आहेत?”

महाविद्यालयीन अभ्यासक्रमात आता महाभारत, रामायणाचे धडे, शिक्षणमंत्र्यांनी केली मोठी घोषणा!

“सरकार त्यांच्या विचारांचं समर्थन करणाऱ्या चित्रपटांना क्लीनचीट देतं, नाझी जर्मनीत हेच व्हायचं”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More