बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

….अन् या पठ्ठ्याने नवरीला नेण्यासाठी थेट जेसीबीच मागवला, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

नवी दिल्ली | लग्न करण्यासाठी अनेकांची वेगवेगळी स्वप्न असतात. आपलं लग्न अनेकांच्या आठवणीत रहावं अशीही अनेकांची इच्छा असते. त्यासाठी लोक काहीही करायला तयार असतात. सोशल मीडियावर असे अनेक भन्नाट व्हिडीओ व्हायरल होत असतात. अशात आता त्यात आणखी एक भर पडली आहे.

सध्या व्हायरल होणारा व्हिडीओ एका नवदाम्पत्याचा आहे. पाकिस्तानातील हा लग्नाचा व्हिडीओ सध्या सगळ्यांचंच लक्ष वेधून घेत आहे. या व्हिडीओमध्ये नवऱ्यानं चक्क नवरीची वरात ही जेसीबीच्या फाळक्यात बसून काढलेली पहायला मिळत आहे.

पाकिस्तानी पत्रकार गुलाम अब्बास शाह यांनी ट्विटरवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. काहीतरी वेगळं करण्याच्या प्रयत्नात या महाशयांनी चव घालवली, तर दुसऱ्या नेटकऱ्यानं लिहलं, याला म्हणतात एडव्हेंचर. अशा अनेक भन्नाट कमेंट या व्हिडीओवर आल्या आहेत.

दरम्यान, जेसीबीमधून वरात काढणारा हा तरुण पहिलाच असावा. अशी अनोखी वरात तुम्हीही पाहिली नसेल. सध्या सोशल मीडियावर याचाच बोलबाला दिसत आहे.

 

थोडक्यात बातम्या- 

“खडसे साहेब एखादा शूटर लावून मला मारुन तरी टाका”

“महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेपासून भाकीत होत आहेत, भाजपने ज्योतिषी बदलावा”

मनोहर मामाच्या अडचणी वाढल्या, न्यायालयाकडून दिलासा नाहीच

भाजप नेत्यांच्या मदतीनेच परमबीर सिंह परदेशात फरार झाले – नाना पटोले

‘माझ्या नवऱ्याची बायको’ फेम अभिनेत्री रसिका सुनिलने चाहत्यांना दिली गुड न्यूज!

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More