देश

कोरोनाच्या आणखी एका प्रकारानं ब्रिटनमध्ये हाहाकार!

नवी दिल्ली | काही दिवसांपूर्वी कोरोनाच्या नव्या प्रकाराबाबत ब्रिटननं साऱ्या जगाला सजग केलं. आता कोरोना व्हायरसच्या आणखी एका प्रकारामुळं ब्रिटनमध्ये पुन्हा हाहाकार माजल्याची माहिती आहे.

व्हायरसचा हा प्रकार दक्षिण आफ्रिकेहून परतलेल्या दोन व्यक्तींमार्फत ब्रिटनमध्ये पोहोचल्याचं म्हटलं जात आहे. ब्रिटनचे आरोग्यमंत्री हँकॉक यांनी बुधवारी यासंदर्भातील माहिती दिली.

ब्रिटनमध्ये सध्याच्या घडीला दोन नव्या प्रकारच्या कोरोना विषाणूची दहशत पाहायला मिळत आहे. कोरोनाचे हे दोन्ही नवे प्रकार अशा व्यक्तींमध्ये आढळून आले आहेत, जे मागील काही दिवसांत दक्षिण आफ्रिकेहून परतले आहेत. कोरोनाचं हे नवं रुप चिंता वाढवणारं असून, त्यामुळं संसर्ग झपाट्यानं वाढण्याची भीती ब्रिटनचे आरोग्यमंत्री हँकॉक यांनी व्यक्त केली.

सध्याच्या घडीला जे दक्षिण आफ्रिकेमघ्ये आहेत किंवा दक्षिण आफ्रिकेतील कोणाच्याही संपर्कात मागील पंधरा दिवसांच्या कालावधीत आले आहेत त्यांनी विलगीकरणाच्या नियमांचं पालन करावं, असं आवाहन हँकॉक यांनी केलं आहे.

थोडक्यात बातम्या-

“जोपर्यंत राज्यात 370 कलम लागू होत नाही तोपर्यंत मी विधानसभा निवडणूक लढवणार नाही”

‘…तर मुंबई महापालिका कंगणाच्या बांधकामाची तोडफोड करु शकते’; न्यायालयाचा कंगणाला दणका

“मोदी देतील तो दर शेतकऱ्यांनी घ्यावा हे फडणवीसांनी बांधावर जाऊन सांगावं”

“तुमची ती नाईट लाईफ आणि जनतेची पार्टी करो ना!”

काँग्रेसला मोठा धक्का! 16 नगरसेवकांनी काँग्रेसला हात दाखवत पवारांच्या उपस्थितीत हाती बांधल घड्याळ

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या