बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोना लढ्यात आणखी एक लस उपलब्ध; आता नाकातून घेता येणार लस

नवी दिल्ली | कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं महारौद्ररूप धारण केलं होतं. त्यामुळे आरोग्य व्यवस्थाही डगमगल्या होत्या. आत्ता कुठे कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात येत असलेली पाहायला मिळत आहे. कोरोनाचं संकट रोखण्यासाठी लसीकरणावर भर दिला जात आहे. अशातच आता लसीकरणाच्या या लढ्यात आणखी एक लस उपलब्ध होणार आहे.

कोरोना लसीकरणाच्या लढ्यात या नवीन लसीचा आता चांगलाच फायदा होऊ शकतो. ही लस नाकातून ड्रॉपच्या माध्यमातून दिली जाणार आहे. या लशीसाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांची चाचणी सुरु आहे. या चाचणीचा पहिला ट्रायल 18 ते 60 वर्षे वयोगटातील लोकांवर करण्यात आला असून ते पूर्णपणे यशस्वी झालं आहे.

नाकातून देणारी ही लस भारत बायोटेककडून तयार केली असल्याचं समजतंय. याची पहिली चाचणी सक्रिय झाली असून या लसीच्या दुसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठी परवानगीही भेटली आहे. या लसीला क्लिनिकल चाचण्यांसाठी नियामक मान्यता प्राप्त झाली आहे.

दरम्यान, राज्यात दिवसेंदिवस कोरोना रूग्णांची संख्या कमी होत चालली आहे. तरीही अजून धोका टळलेला नसून तिसरी संभाव्य लाट येऊ शकते, असं तज्ज्ञांकडून वर्तवलं जात आहे.

थोडक्यात बातम्या –

‘तुम्ही विचार स्वातंत्र्यावर निर्बंध कसं घालू शकता?’; उच्च न्यायालयानं केंद्र सरकारला फटकारलं

…नाहीतर पीएफ खात्यातून ऑनलाईन पैसे काढता येणार नाहीत, जाणून घ्या अधिक माहिती

संजय राठोडांच्या अडचणीत वाढ?; ‘त्या’ प्रकरणाची एसआयटी चौकशी होणार

दिया मिर्झानं पहिल्यांदाच शेअर केला बाळाचा फोटो!

न्यायालयाच्या ‘त्या’ निर्णयानंतर राज्यपालांनी घेतली गृहमंत्री अमित शहांची भेट

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More