बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अमृता फडणवीसांनी शेअर केला आणखी एक व्हिडिओ; पाहा व्हिडिओ

मुंबई | आज 8 मार्च जागतिक महिला दिन आहे. यानिमित्ताने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस यांनी एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

दरवर्षी महिला दिन सादरा केला जातो. या दिवशी प्रत्येकाच्या मनात स्त्रीयांच्या मनात आत्मियता निर्माण होते. महाराष्ट्रात आज स्त्री सशक्तीकरण आणि स्त्री प्रगती याबद्दल खूप बोललं जात आहे. एकीकडे असं बोललं जात असताना दुसरीकडे स्त्रीवरील अत्याचार वाढत आहे. स्त्रीवर होणारे बलात्कार, घाणेरड्या प्रकारे होणारी ट्रोलिंग आणि स्त्रीयांच्या आत्महत्या यांच्यात वाढ होत असल्याचं अमृता फडणवीस म्हणाल्या.

मला हेच सांगायचं आहे की, स्त्रीयांबद्दल तुम्ही जे बोलता, त्यांच्याशी तुम्ही कसे वागता याकडे लक्ष देण्याची गरज आहे. आता पुरोगामी  महाराष्ट्रात बदल घडवायचा असेल तर तो बदल तुम्हीच घडवू शकता. स्त्रीला तिच्या इच्छा पुर्ण करायच्या असतील तर तुम्ही तिला साथ द्या तिला मागे ओढू नका, असा सल्ला अमृता फडणवीस यांनी दिला. त्याचबरोबर त्यांनी महिला दिनाच्या शुभेच्या देखील दिल्या.

दरम्यान, गाण्यावरून आणि त्यांच्या वक्तव्यावरून अमृता फडणवीस चर्चेत असतात. नेटकऱ्यांकडून अमृता फडणवीस यांना टार्गेट केलं जातं. तिला गाणं गायला आवडतं. मी तिला गाणी गायला पूर्ण मुभा देतो. ट्रोलिंग तर काय होत राहणार… असं एका कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं.

थोडक्यात बातम्या-

कर्नाटकमधील मंत्र्याच्या SEX CD प्रकरणात आला हा मोठा ट्विस्ट!

कामगारांच्या मुलांचा शिक्षणापासून लग्नापर्यंतचा खर्च सरकार करणार; सरकारकडून ही योजना लागू

जागतिक महिला दिनानिमित्त गुगलकडून महिलांना अनोेखी भेट; पाहा व्हिडिओ

राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याला राज ठाकरेंची चिंता; पत्राद्वारे केली मास्क घालण्याची विनंती

ऑनलाईन सत्र सुरू असताना वकिलाचा कॅमेरा ऑन राहिला अन्…, पाहा व्हिडिओ

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More