मुंबई | रिपल्बिक वृत्तवाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक केल्यापासून महाराष्ट्रातील भाजप नेते सत्ताधारी सरकारवर निशाणा साधत आहेत. यावर शिवसेनेनं भाजपला चांगलेच सुनावले आहे.
“मराठी माणूस मेला तरी चालेल, पण सवतीच्या पोरास सोन्याच्या चमच्याने दूध पाजायचे असे त्यांचे धोरण स्पष्ट आहे,” असं म्हणतं शिवसेनेनं सामनाच्या संपादकीयमधून भाजपवर हल्लाबोल केला आहे.
“महाराष्ट्रातील भाजपवाल्यांनी अन्वय नाईक यांना न्याय मिळावा म्हणून वाद घालायला हवा. ते मराठी मातीचे पुत्र आहेत. पण भाजपवाल्यांना सवतीची पोरं मांडीवर खेळवण्यात अलीकडे मजा येऊ लागलीये.”
“तसंच पोलिसांनी कायद्याचं पालन केलं. यात चौथा स्तंभ कोसळला असे सांगणारे लोकशाहीतील पहिल्या स्तंभास उखडू पाहत आहेत. एका नौटंक्यासाठी रडणे, छाती बडवणे बंद करा! तरच महाराष्ट्रात कायद्याची बाजू राहील,” असं म्हणत शिवसेनेनं भाजपमधील नेत्यांना टोला लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या-
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयी दाव्याला जो बायडेन यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
अर्णब गोस्वामींना कोर्टाचाही दणका; ‘हे’ आरोप फेटाळले!
सिरीयल पुढे सुरु ठेवण्यासाठी नराधमांना पाठीशी घालणं चुकीचं- प्राजक्ता गायकवाड
अर्णब गोस्वामींवर पोलिसांनी केलेली कारवाई योग्यच- सचिन सावंत
“…म्हणून शांत बसलोय, वर्दी उतरव आणि ये”; पाहा कुणी दिलं पोलिसाला चॅलेंज